निवेदन देऊनही खुलेआम परळी शहरात  मटका सुरू, पोलिसांना गांभीर्य नाही का- नितीन रोडे

परळी शहरात खुलेआम अवैद्य धंदे सुरू असून अनेक गरीबाच्या संसाराची राख रांगोळी होत आहे अनेक सुज्ञ नागरिकांना त्याचा प्रत्येक भागात त्रास होत असून याकडे मात्र परळी पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.

निवेदन देऊनही खुलेआम परळी शहरात  मटका सुरू, पोलिसांना गांभीर्य नाही का- नितीन रोडे
Parli Illegal trades

निवेदन देऊनही खुलेआम परळी शहरात  मटका सुरू, पोलिसांना गांभीर्य नाही का- नितीन रोडे

परळी शहरात खुलेआम अवैद्य धंदे सुरू असून अनेक गरीबाच्या संसाराची राख रांगोळी होत आहे अनेक सुज्ञ नागरिकांना त्याचा प्रत्येक भागात त्रास होत असून याकडे मात्र परळी पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 परळी शहरात खुलेआम अवैद्य धंदे सुरू असून अनेक गरीबाच्या संसाराची राख रांगोळी होत आहे अनेक सुज्ञ नागरिकांना त्याचा प्रत्येक भागात त्रास होत असून याकडे मात्र परळी पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे असे दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते नितीन रोडे यांनी या अवैध धंदेयना आळा घालावा म्हणून तीन दिवसांपूर्वी संभाजी नगर व शहर ठाण्यात अवैध धंदे बंद करा म्हणून निवेदन दिले असून तीन दिवसात कुठल्याही प्रकारची कसलीही कारवाई पोलिसांनी केल्याचे दिसले नाही मात्र मटका पत्ते क्लब जोमात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.(Parli Illegal trades)

याचा अर्थ पोलिसांना याचे थोडे सुद्धा गांभीर्य राहिलेले दिसत नाही या निवेदनाची दखल घेतली नसल्याने लवकरच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी जाऊन भेटून परळी शहरातील कोण तो पोलीस कर्मचारी आहे? जो मटका पत्ते क्लबचा पार्टनर आहे याच्या आशीर्वादने अवैध धंदे शहरात खुलेआम सुरू आहेत याची माहिती देणार असून परळी पोलीस सुद्धा नागरिकांच्या तक्रार करत असून कोणतीही दखल घेत नाहीत जर पोलीसच अवैध धंदे करणाऱ्या लोकांना जवळ किंवा त्यांचे पार्टनर होत असतील तर सामान्य माणसांनी कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल युवक नेते नितीन रोडे यांनी केला आहे.

जर एखादा प्रतिनिधी निवेदन देऊन सुद्धा पोलीस याचे गांभीर्य घेत नसतील तर सामान्य लोकांचे तर काय हाल करीत असतील याचा अंदाज आपण करू शकतो एकच कर्मचारी दोन्ही पोलिस ठाण्याचा कारभार बगतो वसुली करतो ? डी.बी पथकात असून आता पर्यत तो कर्मचारी ड्रेसवर का नसतो  (वर्दी) तो कोण पोलीस कर्मचारी आहे सर्व परळीकराना माहीत आहे मात्र वरिष्टना का याचे गांभीर्य नाही असा आरोप सुद्धा केला आहे परंतु जो पर्यत परळी शहरांतील हे अवैध धंदे बंद होत नाहीत तो पर्यत मी शांत बसणार नाही याची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याना घ्यावीच लागणार आहे दखल नाही घेतल्यास लवकरच पोलीस ठाण्या समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते नितीन रोडे यांनी सांगितले आहे.(Parli Illegal trades)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/