पोलिसाच्या डोळ्यात स्प्रे मारुन चाकूने हल्ला

पोलिसांनी एका सोनसाखळी चोरट्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली. आपण पकडले जाऊ नये, यासाठी चोरट्याने पोलिसांच्या डोळ्यावर स्प्रे मारुन चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे

पोलिसाच्या डोळ्यात स्प्रे मारुन चाकूने हल्ला
Pimpri Chinchwad Crime News

पोलिसाच्या डोळ्यात स्प्रे मारुन चाकूने हल्ला

 पोलिसांनी एका सोनसाखळी चोरट्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली. आपण पकडले जाऊ नये, यासाठी चोरट्याने पोलिसांच्या डोळ्यावर स्प्रे मारुन चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड  परिसरात घडली आहे.

 पोलिसांनी एका सोनसाखळी चोरट्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली. आपण पकडले जाऊ नये, यासाठी चोरट्याने पोलिसांच्या डोळ्यावर स्प्रे मारुन चाकूने हल्ला (Attempt to Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील  पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.29) सकाळी साडेसातच्या सुमारास निगडी प्राधिकरण  येथे घडला आहे.(Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले Satish Jalindar Dhole (वय-42) हे जखमी झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. राजू खेमू राठोड (वय-39 रा. उजनी, एकंबी, ता. औसा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडीमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांकडून हद्दीत गस्त घातली जात आहे. याच दरम्यान ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू राठोड सोनसाखळी चोरून पळून जात असल्याचा संशय पोलीस हवालदार ढोले यांना होता. त्यामुळे ढोले यांनी आरोपीचा पाठलाग केला. त्यावेळी राजूने आपण पकडले जाऊ नये यासाठी ढोले यांच्यावर चाकूने वार  केला. या दरम्यान पोलीस कर्मचारी राकेश हगवणेही  त्याठिकाणी आले. आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केले आणि तेथून पळून गेला. या घटनेची माहिती तात्काळ चेन स्नॅचिंग विरोधी पथकाला कळवण्यात आली. तसेच आरोपीचे वर्णन सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.(Pimpri Chinchwad Crime News)