संदिप कस्पटे यांच्या कामाची नोंद मतदार निश्चित घेतील,चंद्रकांतदादा पाटील नगरसेवक संदिप कस्पटे यांनी सैन्यदलाला दिले पाच लाख रुपये

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक समर्पण भावनेने समाजकार्य करीत आहेत. यामध्ये संदिप कस्पटे यांचे काम इतर कार्यकर्त्यांना आदर्श घेण्यासारखे आहे.

संदिप कस्पटे यांच्या कामाची नोंद मतदार निश्चित घेतील,चंद्रकांतदादा पाटील नगरसेवक संदिप कस्पटे यांनी सैन्यदलाला दिले पाच लाख रुपये
Pimpri Chinchwad Municipal Corporation

संदिप कस्पटे यांच्या कामाची नोंद मतदार निश्चित घेतील,चंद्रकांतदादा पाटील नगरसेवक संदिप कस्पटे यांनी सैन्यदलाला दिले पाच लाख रुपये

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक समर्पण भावनेने समाजकार्य करीत आहेत. यामध्ये संदिप कस्पटे यांचे काम इतर कार्यकर्त्यांना आदर्श घेण्यासारखे आहे.

पुणे जिल्हा प्रतिनिधी नितीन सरोदे:

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक समर्पण भावनेने समाजकार्य करीत आहेत. यामध्ये संदिप कस्पटे यांचे काम इतर कार्यकर्त्यांना आदर्श घेण्यासारखे आहे. मातृभुमीचे रक्षण करणा-या सैन्यदलासाठी संदिप कस्पटे यांनी आपले पाच वर्षांचे महानगरपालिकेचे पाच लाखांचे मानधन दिले आहे. राजकारण करीत असतानाही सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी केलेल्या या कामाची नोंद मतदार निश्चित घेतील असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.(Pimpri Chinchwad Municipal Corporation)

 निगडी प्राधिकरण येथिल खान्देश मराठा मित्र मंडळ सभागृहात भाजपा शहर विस्तारकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील बोलत होते. या बैठकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपाचा नगरसेवक संदिप कस्पटे यांनी आपले पाच वर्षांचे मनपातील मानधन पाच लाख रुपये भारतीय सैन्यदलाला दिले. त्याचा धनादेश कस्पटे यांनी भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुर्पूद केला.

यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपा शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस विजय फुगे, राजू दुर्गे आदींसह विस्तारक उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल थोरात, सुत्रसंचालन विजय फुगे आणि आभार राजू दुर्गे यांनी मानले.(Pimpri Chinchwad Municipal Corporation)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/