आज पत्रकारांच्या कुटुंबियातील विधवा महिलांसाठी साडीचोळी वाटपचा कार्यक्रम, पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पहिला ऐतिहासिक उपक्रम ठरणार

आज 21 व्या शतकातही विधवा प्रथा खूप भयंकर आहे. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी पत्रकार संघाने परिवर्तनवादी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

आज पत्रकारांच्या कुटुंबियातील विधवा महिलांसाठी साडीचोळी वाटपचा कार्यक्रम, पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पहिला ऐतिहासिक उपक्रम ठरणार
Press Association

आज पत्रकारांच्या कुटुंबियातील विधवा महिलांसाठी साडीचोळी वाटपचा कार्यक्रम, पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पहिला ऐतिहासिक उपक्रम ठरणार

आज 21 व्या शतकातही विधवा प्रथा खूप भयंकर आहे. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी पत्रकार संघाने परिवर्तनवादी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

आज 21 व्या शतकातही विधवा प्रथा खूप भयंकर आहे. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी पत्रकार संघाने परिवर्तनवादी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मकर संक्रांतीनिमित्त पत्रकारांच्या कुटुंबातील विधवा महिलांना साडीचोळी भेट देऊन त्यांचा मान्यवर महिलांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात येणार आहे,अशी माहिती पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी दिली.(Press Association)


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली, पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या पुढाकारातून पत्रकार संघाच्या वतीने सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात.यावर्षी पासून पत्रकार संघाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियांच्या कुटुंबियातील विधवा महिलांना सन्मानाने साडी चोळी भेट देऊन त्यांचा देखील सौभाग्यवती प्रमाणे सन्मान करण्यात येणार आहे त्याच बरोबर पत्रकारांच्या कुटुंबियातील फक्त महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मकर संक्रांतीचे औचित्य साधून पत्रकारांच्या कुटुंबातील महिलांसाठी संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धेचे आयोजन देखील  करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच वृत्तपत्र सृष्टीतील पत्रकारांच्या कुटुंबातील ज्या ही महिला विधवा आहेत,यामध्ये संबंधित पत्रकारांची आई, बहिण, वहिनी अथवा ज्या पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, अशा पत्रकारांच्या विधवा पत्नी यांना मकर संक्रांति निमित्त आज शनिवार दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता स. मा. गर्गे भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहच्या पाठीमागे, डीपी रोड, बीड येथील सभाग्रहात माजी आमदार उषाताई दराडे, पुरोगामी विचाराच्या झुंजार नेत्या सुशीलाताई मोराळे,माजी नगराध्यक्ष डॉक्टर दीपाताई क्षीरसागर,अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्राचार्य सविताताई शेटे,युवा नेतृत्व सौ सारिका क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी सौ. संप्रदा बीडकर आदी मान्यवर महिलांच्या उपस्थितीत साडीचोळी भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या सन्मानासाठी पत्रकारांच्या कुटुंबियातील विधवा महिलांनी समाजाची पारंपारिक, अन्यायकारक रीतीरिवाजाची पर्वा न करता सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार संघाच्या नूतन जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती प्रतिभा कालिदास गणोरकर आणि शेख आयेशा शेख रफिक यांनी केले आहे.(Press Association)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/