पंतप्रधान मोदींचा विराट, मिलिंद, ऋजुतासहीत दिग्गजांशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फिट इंडिया डायलॉग कार्यक्रमात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, पॅरालिम्पियन देवेंद्र झाझरिया, अभिनेता मिलिंद सोमन, डायटीशियन ऋजुता दिवेकर यांच्याशी ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला..

पंतप्रधान मोदींचा विराट, मिलिंद, ऋजुतासहीत दिग्गजांशी संवाद
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फिट इंडिया डायलॉग कार्यक्रमात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, पॅरालिम्पियन देवेंद्र झाझरिया, अभिनेता मिलिंद सोमन, डायटीशियन ऋजुता दिवेकर यांच्याशी ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. फिटनेसबद्दल जागृत असणारे आणि इतरांनाही जागृक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दिग्गजांनी आपल्या प्रयत्नांबद्दल आणि उत्तम स्वास्थ्याबद्दल आपले विचार पंतप्रधानांसमोर व्यक्त केले.
पंतप्रधानांनी फिटनेसच्या रुटीनबद्दल विचारलं तेव्हा विराटनं 'मला एका मोठा बदल पाहायला मिळाला. ज्या पीढीत आम्ही खेळणं सुरू केलं. फिटनेस संदर्भात अनेक बदल झालेले दिसले. काय बदल करायचे आहेत, याची जाणीव आपल्यालाच व्हायला हवी. अगोदर खेळ सुधारण्यासाठी फिटनेस सेशन सुरू केले होते. मात्र आता प्रॅक्टिस हुकली तर काही वाटत नाही पण फिटनेस सेशन मिस झालं तर खूप वाईट वाटतं' असं म्हणत विराटनं पंतप्रधानांसमोर आपला अनुभव व्यक्त केला. दरम्यान, विराट कोहली सध्या दुबईमध्ये आहे. इथे आज आयपीएलमध्ये विराट टीमचा मुकाबला किंग्स इलेव्हन पंजाबसोबत होणार आहे.
अभिनेता, मॉडेल आणि धावपटू मिलिंद सोमन याच्याशी बोलताना पंतप्रधानांनी त्यांच्या वयाबद्दल हलकीफुलकी मस्करीही केली. 'मिलिंदजी, मी तुम्हाला विचारू इच्छितो की ऑनलाईन तुमचं जे वय दिसतं ते योग्य आहे का?' पंतप्रधानांनी विचारलेल्या या प्रश्नावर दोघंही हसू लागले. यावर, 'मला अनेक लोक विचारतात की तुम्ही खरोखरच ५५ वर्षांचे आहात का? पण मी आपल्या पूर्वजांना पाहतो, ते कसे १००-१०० किलमीटर चालत होते. मी फिट इंडिया मूव्हमेंटचं कौतुक करतो' असं म्हणत मिलिंद सोमन यांनी आपले काही अनुभव शेअर केले.
मिलिंद सोमन यांच्या आईचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्या पुशअप करताना दिसत होत्या. 'मी हा व्हिडिओ चार वेळा पाहिला. माझा त्यांना विशेष प्रणाम' असं म्हणत पंतप्रधानांनीही त्यांचं कौतुक केलं. यावर मिलिंद सोमन यांनी 'आम्ही दोघं एकमेकांना प्रोत्साहीत करत असतो' असं म्हटलं.
ऋजुता दिवेकर यांच्याशी बोलताना पंतप्रधानांना आपल्या आईचीही आठवण आली. 'करोना काळात आठवड्यातून दोन - तीन वेळा आईशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करतो. मी जेव्हाही फोन करतो तेव्हा ती मला विचारते की हळदीचं दूध घेतो की नाही?' असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.
पिंपरी, पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
___________
Also see : "सफाळा पोलीस" व "सर्पमित्र" यांना तांदूळवाडी किल्यावर हरवलेले पर्यटक शोधण्यात यश..!