पुण्यात गांजा विकायला आलेल्या तरुणाला अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या.

पुण्यात गांजा विकायला आलेल्या तरुणाला अटक
Pune Crime

पुण्यात गांजा विकायला आलेल्या तरुणाला अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या.

गांजा बाळगल्याप्रकरणी पुण्यातील महाळुंगे पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून आठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तात्या मदन काळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.


 महाळुंगे पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 8 किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

कुरूळी गावातील ज्ञानराज मंगल कार्यालयाजवळ तात्या मदन काळे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती महाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी तात्या काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपीकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 8 किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि इतर साहित्य असा एकूण 1 लाख 69 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर ग्रामीण पोलिसांनी चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून गांजा तस्करी करणाऱ्यांना काही दिवसांपूर्वी पकडलं होतं. एका कारमधून उत्तर प्रदेशमधील आरोपी गांजा तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. कारच्या सीटखाली आणि डिक्कीच्या खालच्या भागात गांजा लपवून ठेवण्यात आला होता.

35 पॅकेटमध्ये 69 किलो 500 ग्राम गांजा सापडला आहे. जवळपास 6 लाख 95 हजार रुपये किमतीच्या गांजाची तस्करी केली जात होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील घरकुलात अवैध रित्या गांजा साठवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांच्या या कारवाईत एकूण 15 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आले आहे.