इंटरनेट सुविधा व्यवसायाच्या स्पर्धेतून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, आमचे पण रांजणगाव गणपती गावात इंटरनेट सुविधा पुरविण्याचा व्यवसाय असुन प्रतिस्पध्यांचे नुकसान करून आमचा व्यवसाय वाढवायचा होता म्हणून मी चोरी केली आहे.

इंटरनेट सुविधा व्यवसायाच्या स्पर्धेतून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक
Pune Crime News

इंटरनेट सुविधा व्यवसायाच्या स्पर्धेतून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, आमचे पण रांजणगाव गणपती गावात इंटरनेट सुविधा पुरविण्याचा व्यवसाय असुन प्रतिस्पध्यांचे नुकसान करून आमचा व्यवसाय वाढवायचा होता म्हणून मी चोरी केली आहे.

पुणे जिल्हा प्रतिनिधी राम बनसोडे:

फिर्यादी नाम तौसिफ गुलामकादर खान, रा. शिरूर, जि.पुणे यांचा रांजणगाव गणपती येथे इंटरनेट सुविधा पुरविण्याचा व्यवसाय आहे. दिनांक २३/०१/२०२२ रोजी रात्री ०८.४५ वाजताचे सुमारास तौसिफ गुलामकादर खान, रा. शिरूर मुंबई बाजार, ता. शिरूर, जि.पुणे यांना त्यांचे ग्राहकांनी फोन करून कळविले की, तुमची इंटरनेट सुविधा बंद आहे असे कळविल्यावर तौसिफ खान यांनी त्यांचे कामगारांना पाहणी करण्यास सांगितले असता त्यांचे लक्षात आले की, त्याचे राजणगाव गणपती येथिल बांदल कॉम्प्लेक्स बिल्डींग, एकदंत पतसंस्था बिल्डींग, रांजणगाव ग्रामपंचायत बिल्डींग वरील इंटरनेट सुविधा पुरविणे करीता लागणारे स्विच व मोडेम असा एकुण १३,५००/- रूपये किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरून नेले बाबत राजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Pune Crime News)

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बलबत मांडगे यांनी तपास पथकातील सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो.कॉ विजय शिंदे, पो. कॉ. रघुनाथ हळनोर यांना योग्य त्या सुचना देवून तपास करणे बाबत सांगितले वरून तपास पथकातील सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो. कॉ. रघुनाथ हळनोर, पो.कॉ. विजय शिंदे यांनी परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून आरोपी नामे योगेश मलकप्पा सनके, वय २४ वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि.पुणे, मुळ रा. शंकरनगर होटगी रोड सोलापुर यास अटक करून चोरीस गेलेला सर्व माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.

सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, आमचे पण रांजणगाव गणपती गावात इंटरनेट सुविधा पुरविण्याचा व्यवसाय असुन प्रतिस्पध्यांचे नुकसान करून आमचा व्यवसाय वाढवायचा होता म्हणून मी चोरी केली आहे.सदरची कामगिरी मा डॉ अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, राहुल घस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो. कॉ विजय शिंदे, पो.कॉ रघुनाथ हळनोर यांनी केली आहे.सदर आरोपी याने अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे पोलीस स्टेशन हद्दीत केले.असण्याची शक्यता असुन त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा अधिक तपास पो. ना. राजेश ढगे हे करीत आहे.(Pune Crime News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/