पुण्यातील प्रवाशांना दिलासा

लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची वाहतूक सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे.

पुण्यातील प्रवाशांना दिलासा
Pune PMPMl Bus

पुण्यातील प्रवाशांना दिलासा

लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची वाहतूक सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे.

काही दिवसांत प्रवासी संख्येत वाढ झाल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाने बसेसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून सुमारे 1100 बस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धावतील. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची वाहतूक सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे. सध्या दररोज सुमारे 4,25,000 हून अधिक प्रवासी पीएमपीतून प्रवास करीत आहेत.(Pune PMPMl Bus)


कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील.राज्य सरकारने सोमवारी ब्रेक द चेन अंतर्गत नवे नियम जारी केले. या नव्या नियमांनुसार सरकारने पुण्याचा समावेश लेव्हल तीनमध्ये केला असून येथे तिसऱ्या लेव्हलचे सर्व नियम लागू असतील. या नियमानुसार येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. याच कारणामुळे येथील व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारने निर्णय बदलावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा येथील व्यापाऱ्यांनी दिला आहे.

याच मागणीला घेऊन व्यापाऱ्यांतर्फे पुण्यात 3 ऑगस्ट रोजी पुण्यात घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.पुण्यातील व्यापाऱ्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारने नियमांत बदल केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. सरकारविरोधात सर्व व्यापारी घंटानाद आंदोलन करणार आहेत.(Pune PMPMl Bus)

तसेच आमच्यावर खटले भरले तरी चालतील पण बुधवारपासून आम्ही दुकानं खुली करणार आहोत. असा इशारा व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.