पुणे ग्रामीण जिल्हयातील पोलीस आवारात अनेक दिवसांपासून, वर्षापासून बेवारस स्थितीत गाड्या पडून आहेत.

जाहीरनाम्यात प्रसिध्द केलेल्या बेवारस वाहनांबाबत आपल्या मालकीहक्कांचे, हितसंबंध, वारसाहक्क, तारणहक्क (Hypothecation), विमाहक्क (Insurance claim) इत्यादी हक्काबाबत मुळ दस्तऐवजांसह उपरोक्त सर्व पोलीस ठाण्यास जाहीरनामा प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून ६० दिवसाच्या आत (२ महिने ) संपर्क करून आपल्या मालकी हक्काची कायदेशीर खात्री देवून आपले वाहन घेवून जावे.

पुणे ग्रामीण जिल्हयातील पोलीस आवारात अनेक दिवसांपासून, वर्षापासून बेवारस स्थितीत गाड्या पडून आहेत.
Pune Police Station

पुणे जिल्हा प्रतिनिधी नितीन सरोदे:

पुणे ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी बारामती शहर, वालचंदनगर, शिकापूर, हवेली, खेड, मंचर, घोडेगाव, जुन्नर, ओतूर, आळेफाटा, सासवड, शिरुर वरील सर्व पोलीस ठाणे परिसरात बेवारस स्थितीत दुचाकी, तिनचाकी, चारचाकी अशी एकुण ५४४ वाहने व वाहनांचे सांगाडे पडून असून त्यांनी आजपावेतो सर्वतोपरी प्रयत्न करूनही बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेतला असता संबंधीत वाहनांचे मालक मिळून न आल्याने व आजपावेतो उपरोक्त वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीही पोलीस स्टेशन येथे संपर्क अथवा मालकी हक्काचा अथवा हक्कांचा दावा केलेला नाही. सदरची वाहने पोलीस ठाणे आवारात अनेक दिवसांपासून, वर्षापासून बेवारस स्थितीत पडून आहेत.(Pune Police Station)

जाहीरनाम्यात प्रसिध्द केलेल्या बेवारस वाहनांबाबत आपल्या मालकीहक्कांचे, हितसंबंध, वारसाहक्क, तारणहक्क (Hypothecation), विमाहक्क (Insurance claim) इत्यादी हक्काबाबत मुळ दस्तऐवजांसह उपरोक्त सर्व पोलीस ठाण्यास जाहीरनामा प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून ६० दिवसाच्या आत (२ महिने ) संपर्क करून आपल्या मालकी हक्काची कायदेशीर खात्री देवून आपले वाहन घेवून जावे. तद्नंतर संबंधित वाहनांवर आपला हक्क सांगता येणार नाही.

तसेच वरील ५४४ वाहनांचा शोध घेणे कामी https://puneruralpolice .gov.in/Flash सदर लिंकवर जावुन आपले वाहन मिळुन आल्यास संबंधीत पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.(Pune Police Station)

जनसंपर्क अधिकारी, पुणे ग्रामीण, पुणे