सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घोषणा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून सध्या 2020-21 मधील प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घोषणा
Pune University Exams

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घोषणा

Big announcement of Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून सध्या 2020-21 मधील प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 2020-21 या शैक्षणिक वर्षातील सत्र परीक्षांबाबत महत्वाची घोषणा केली आहे.दुसऱ्या सत्राची परीक्षा ही जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षेच्या तयारीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून सध्या 2020-21 मधील प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा 15 मे पर्यंत संपणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून जून महिन्यात दुसऱ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या सत्राचं वेळापत्रक जाहीर होईल, 

पुणे, अहमदनगर ,नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयं आहेत. विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांना पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थी बसणार आहेत.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुंची ऑनलाईन बैठक घेतली होती.

त्या बैठकीनंतर कोरोना विषाणू संसर्गामुळं राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील, असा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणं महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येत आहेत.

 कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या.आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं होतं .

तेराही अकृषी विद्यांपीठात ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परिक्षा ऑनलाईन असेल, असं उदय सामंत म्हणाले आहेत.