मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधांची मामाला कुणकुण,डोकं चिरडून हत्या

40 वर्षीय सपन कुमार साहू पंजाबच्या लुधियाना शहरातील जागिरपूर रोड परिसरातील राज एन्क्लेव्ह इमारतीतील राहत्या घरी रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला होता.

मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधांची मामाला कुणकुण,डोकं चिरडून हत्या
Punjab Crime News

मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधांची मामाला कुणकुण,डोकं चिरडून हत्या

40 वर्षीय सपन कुमार साहू पंजाबच्या लुधियाना शहरातील जागिरपूर रोड परिसरातील राज एन्क्लेव्ह इमारतीतील राहत्या घरी रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला होता.

मामीसोबतच्या अनैतिक संबंधातून भाच्याला प्राण गमवावे लागल्याची घटना पंजाबमध्ये उघडकीस आली आहे. मामाला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने आपल्या 40 वर्षीय भाच्याची लोखंडी दांडक्याने डोकं चिरडून हत्या केली.40 वर्षीय सपन कुमार साहू पंजाबच्या लुधियाना शहरातील जागिरपूर रोड परिसरातील राज एन्क्लेव्ह इमारतीतील राहत्या घरी रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला होता. झोपेतच डोक्यावर अवजड वस्तूने वार केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं.(Punjab Crime News)

सपन फोन उचलत नसल्यामुळे त्याचा मालक सिद्धू कुमार चौकशी करायला घरी गेला. तेव्हा घरी तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं आणि हा प्रकार उघडकीस आला. मात्र घरात शिरलेल्या चोरांनी भाच्याची हत्या केल्याचा बनाव मामाने रचला होता.सपन कुमार साहू विटांच्या कंपनीमध्ये कंत्राटदार म्हणून काम करत होता. “रविवारी सकाळी मी त्याला एका कंत्राटाबद्दल विचारण्यासाठी फोन केला, मात्र समोरुन काहीच उत्तर आलं नाही. मी त्याच्या घरी गेलो, तेव्हा त्याच्या मामाने घराचा दरवाजा उघडला.आम्ही दोघं त्याच्या खोलीत गेलो, तेव्हा तो तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचं डोकं चिरडण्यात आलं होतं.” असं मालक सिद्धू कुमारने पोलिसांना सांगितलं.

सपनचा मामा सर्वन कुमार साह सुरुवातीपासूनच या प्रकरणातील प्रमुख संशयित होता. चौकशीदरम्यान त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन मामाला अटक केली.ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी सर्वन कुमार साह याला तुरुंगवास झाला होता. मार्च महिन्यात तो जामिनावर सुटून आला होता. दरम्यानच्या काळात त्याच्याच घरात राहणाऱ्या भाच्याचे म्हणजेच सपनचे आपल्या मामीसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते. 14 ऑगस्टच्या रात्री सपन झोपायच्या तयारीत असताना सर्वनने त्याच्या डोक्यात लोखंडी दांडक्याने प्रहार केला.(Punjab Crime News)

मात्र चोरांनी घरात शिरुन भाच्याची हत्या केल्याचा बनाव त्याने रचला होता.