RBI आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याच्या तयारीत

नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेला परवाना रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनी कंट्रोल या वेबसाईट दोन सूत्रांच्या माहितीने हे वृत्त दिले आहे.

RBI आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याच्या तयारीत
RBI BANK NeWS

RBI आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याच्या तयारीत

RBI is preparing to revoke the license of another bank

नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेला परवाना रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनी कंट्रोल या वेबसाईट दोन सूत्रांच्या माहितीने हे वृत्त दिले आहे.

आर्थिक अडचणीत अडकलेली आणि घोटाळ्याच्या आरोपाने घेरलेली Sambandh Finserve Pvt Ltd या मायक्रो फायनान्स कंपनीचा परवाना लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे. नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेला परवाना रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनी कंट्रोल या वेबसाईट दोन सूत्रांच्या माहितीने हे वृत्त दिले आहे.

 या बँकेची निव्वळ मालमत्ता ही कमीत कमी मर्यादेपेक्षा कमी आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात या बँकेची आर्थिक स्थिती आणखी वाईट झाली आहे. बँकेतील आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर आरबीआयने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच बँकेच्या Net worth मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर कंपनीचा परवाना का रद्द केला जाऊ नये? असा प्रश्नही आरबीआयने यात केला आहे.

तसेच दुसरीकडे आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आरबीआयकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच Sambandh Finserve या कंपनीकडूनही याबाबतचे कोणतेही विधान जारी करण्यात आलेले नाही.

नियम काय?
Sambandh Finserve Pvt Ltd या मायक्रो फायनान्स कंपनीचे NBFC-MFI म्हणून रजिस्ट्रेशन झाले होते. आरबीआयच्या नियमावलीनुसार, कोणत्याही नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीला टियर 1 आणि टियर 2 च्या अंतर्गत एक निश्चित भांडवल राखणे बंधनकारक आहे. तसेच, ही रक्कम त्यांच्या एकूण जोखमीच्या म्हणजेच aggregate risk-weighted assets च्या कमीत कमी 15 टक्के असणे आवश्यक आहे

मार्च 2020 मध्ये Sambandh Finserve या बँकेची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता 461 कोटी रुपये इतकी होती. या काळात या बँकेला 5.22 कोटी रुपयांचा नफाही मिळाला होता. त्यासोबतच त्यांचा NPA 0.67 टक्के इतका होता.

संबंध फिनसर्वमध्ये झालेल्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक किंडो असल्याचे बोललं जात आहे. दीपक किंडो यांना चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

दरम्यान गेल्यावर्षी 7 ऑक्टोबरला एका वरिष्ठ व्यवस्थापकाने बँकेच्या संचालक मंडळाला पत्र लिहिले होते. त्यात दीपक किंडो हे 2015-16 या आर्थिक वर्षापासून बँकेच्या आर्थिक व्यवहारात छेडछाड करत असल्याचे दावा करण्यात आला होता.

यानुसार काही वरिष्ठ अधिकारी बँकेत बनावट कर्जाची खाती तयार करतात. हा सर्व गैरप्रकार दीपक किंडो आणि क्रेडिट हेड यांच्या देखरेखीखाली घडत आहे, असेही या पत्रात उल्लेख करण्यात आला होता.

या पत्रात असे म्हटले आहे की बँकेची मालमत्ता अंडर मॅनेजमेंट पोर्टफोलिओ 140 कोटी इतकी आहे. मात्र कंपनीचा AUM केवळ 391 कोटी इतका आहे. म्हणजेच जवळपास 251 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

बँक बोर्ड संचालकांना देण्यात आलेल्या या पत्रावर मुख्य आर्थिक अधिकारी जेम्स आणि अंतर्गत लेखापरीक्षण प्रमुख यांच्यासह तीन जणांच्या सह्या आहेत.