रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई,सहकारी बँकेला ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड

राबोबँक यूएकडून आरक्षित निधीच्या हस्तांतरणासंदर्भात कायदेशीर पद्धतीचे पालन करण्यात आले नाही. ISE तपासणीत ही बाब समोर आली होती.

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई,सहकारी बँकेला ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड
RBI Updates

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई,सहकारी बँकेला ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड

राबोबँक यूएकडून आरक्षित निधीच्या हस्तांतरणासंदर्भात कायदेशीर पद्धतीचे पालन करण्यात आले नाही. ISE तपासणीत ही बाब समोर आली होती. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी क्षेत्रातील राबोबँक यूए  या बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. राबोबँक यूएकडून आरक्षित निधीच्या हस्तांतरणासंदर्भात कायदेशीर पद्धतीचे पालन करण्यात आले नाही. ISE तपासणीत ही बाब समोर आली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने Rabobank UA वर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला  25 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.(RBI Updates)

Punjab and Sind Bank ने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन केले नाही. 16 आणि 20 मे रोजी बँकेला याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बँकेने निष्काळजीपणा सुरुच ठेवल्याने RBI ने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच बँकेला कारण द्या नोटीसही बजावण्यात आली होती.भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला  एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.(RBI Updates)

याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.