न्यूड फोटोशूटसाठी मोठ्या रकमेची ऑफर होती

निकितानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये मला उमेश कामत यांनी राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड शूटबद्दलही विचारलं होतं.

न्यूड फोटोशूटसाठी मोठ्या रकमेची ऑफर होती
Raj Kundra Case

न्यूड फोटोशूटसाठी मोठ्या रकमेची ऑफर होती

 निकितानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये मला उमेश कामत यांनी राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड शूटबद्दलही विचारलं होतं.

राज कुंद्रा यांच्याशी संबंधित अश्लील प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. पूनम पांडे आणि सागरिका शोनासारख्या मॉडेल्सनी राज कुंद्रावर यापूर्वीही गंभीर आरोप केले आहेत. आता या यादीत आणखी एका मॉडेलचं नाव जोडलं गेलं आहे, असा दावा आहे की तिला राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपवर न्यूड शूटसाठी दर दिवसाला 25,000 रुपयांची ऑफर देण्यात आली होती.(There was an offer of a large sum for a nude photoshoot)

निकिता फ्लोरा सिंह असं या मॉडेलचं नाव आहे. राज कुंद्रा यांचे वैयक्तिक सहाय्यक उमेश कामत यांनी ही ऑफर केल्याचा आरोप निकितानं केला आहे.निकिता फ्लोरा सिंहनं आपल्या एका ट्विटद्वारे हे आरोप केले आहेत. निकितानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.नोव्हेंबर 2020 मध्ये मला उमेश कामत यांनी राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड शूटबद्दलही विचारलं होतं, मात्र मी नकार दिला. कामतनं मला यासाठी दर दिवसाला 25,000 रुपये ऑफर केले होते. देवाचे आभार मानते की मी कुंद्रासारख्या मोठ्या नावात पडले नाही.
यासोबतच निकितानं हे देखील उघड केलं की झारखंडमधील एका महिलेनं केवळ हॉटशॉट्ससाठी शूट केल्यामुळे तिचा घटस्फोट झाला आहे. निकिता लिहिलं.झारखंडमधील एका महिलेला तिच्या पतीने घटस्फोट दिला होता कारण तिनं हॉटशॉट्ससाठी शूट केलं होतं.राज कुंद्रा अश्लीलता प्रकरण उघड झाल्यानंतर एकामागून एक मॉडेल, हॉटशॉट्सवर गंभीर आरोप करत आहे. निकिताच्या आधी सागरिका शोना सुमन आणि पूनम पांडे यांनी राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीवर न्यूड शूट करण्याची विचारणा केल्याचा आरोप केला होता.

एकीकडे पूनम पांडेनं असा दावा केला होता की तिचा राज कुंद्रा कंपनीबरोबर करार संपला तेव्हा त्याच्या कंपनीतील लोकांनी तिला जिवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही तर पूनम पांडेनं तिचा वैयक्तिक नंबर राज कुंद्राच्या कंपनीने लीक केल्याचा आरोप केला होता.सागरिकानं पत्रकार परिषदेत राज कुंद्रावर फेब्रुवारीमध्ये गंभीर आरोप केले होते. राज कुंद्राच्या अटकेनंतर बी सागरिका हॉटशॉट्स अ‍ॅपबद्दल उघडपणे बोलली.

यानंतर सागरिकानं असा दावा केला होता की राज कुंद्रा विरोधात बोलल्यानंतर तिला मृत्यू आणि बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. याबाबत सागरिकाने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.सध्या राज कुंद्रा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती, त्यानंतर 23 जुलैपर्यंत त्याला रिमांडवर पाठवण्यात आलं होतं. पोलिसांनी राज कुंद्राला पुन्हा 23 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्यानंतर कोर्टाने त्याचा रिमांड 27  जुलैपर्यंत वाढवला आहे.(There was an offer of a large sum for a nude photoshoot)

राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यात पोलिस गुंतले आहेत, हे न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर न्यायालय याप्रकरणी निर्णय देईल.