राज कुंद्राची कंपनी महिलेच्या बँक खात्यात कोट्यवधी पैसे का पाठवायची?

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणाचे धागेदोरे आता थेट उत्तर प्रदेशच्या कानपूर शहराशी जोडले गेले आहेत.

राज कुंद्राची कंपनी महिलेच्या बँक खात्यात कोट्यवधी पैसे का पाठवायची?
Raj Kundra Case

राज कुंद्राची कंपनी महिलेच्या बँक खात्यात कोट्यवधी पैसे का पाठवायची?

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणाचे धागेदोरे आता थेट उत्तर प्रदेशच्या कानपूर शहराशी जोडले गेले आहेत.

 अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांच रोज वेगवेगळे खुलासे करत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे आता उत्तर प्रदेशच्या कानपूर शहराशी देखील जोडले गेले आहेत. या प्रकरणी आता अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या व्यतिरिक्त कानपूरच्या एका महिलेचं देखील बँक खातं सील करण्यात आलं आहे. या महिलेच्या बँक खात्यात अश्लील चित्रपट निर्मितीच्या उत्पन्नाचे कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.(Why should Raj Kundra's company send crores of money to a woman's bank account?)

हॉटशॉट्सच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अरविंद कुमार नावाचा एक व्यक्ती आहे. या अरविंदच्या पत्नीचं नावच हर्षिता असं आहे. अरविंद हा फक्त त्याच्या पत्नीच्याच नव्हे तर त्याचे पिता नर्वदा श्रीवास्तव यांच्याही बँक खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करायचा. अरविंद अ‍ॅपमधून कमावलेले पैसे आपल्या कुटुंबियांच्या बँक खात्यात का ट्रान्सफर करायचा, याबाबत सध्या तपास सुरु आहे.


संबंधित बँक खात्यांचा उपयोग हा सट्टेबाजी किंवा ब्लॅकमनीचा पैसा वळवण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. हर्षदा आणि नर्वदा यांच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर काही दिवसांनी ते पैसे वेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले जायचे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर आता अरविंदचं बँक अकराउंटदेखील सील करण्यात आलं आहे. या खात्यात तब्बल 1.81 कोटी रुपये होते.


हर्षिता श्रीवास्तव नावातं बँक अकाउंट हे सहा वर्षांपूर्वी उघडण्यात आलं आहे. कानपूरच्या बर्रा येथील पंजाब नॅशनल बँकेत हे खातं आहे. या अकाउंटला जेव्हा सील केलं तेव्हा 2 कोटी 32 लाख 45 हजार रुपये होते. पोलिसांनी तपास केला तेव्हा संबंधित खातं हे 2015 मध्ये म्हणजेच सहा वर्षांपूर्वी उघडण्यात आल्याचं उघड झालं. गेल्या दोन वर्षातच या खात्यातील ट्रान्झेक्शन वाढलं आहे. तर दुसरं नर्वदा श्रीवास्तव नावाचं बँक खातं हे कँट येथील स्टेट बँकेत आहे. या खात्यात 5 लाख 59 हजार 151 रुपये जमा आहेत.


राज कुंद्राचं अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट हे पूर्णपणे व्हाट्सअ‍ॅप ग्रुपद्वारेच चालायचं. एचएस नावाच्या ग्रुपमध्ये कुंद्रा पैशांच्या देवाणघेवाण विषयी चर्चा करायचा. अरविंद श्रीवास्तव हा याच ग्रुपशी संबंधित आहे. याच ग्रुपमध्ये पैशांच्या देवाणघेवाणवर चर्चा व्हायची. तसेच कुणाच्या खात्यात किती पैसे टाकायचे, याबाबतची चर्चा याच ग्रुपमध्ये व्हायची.

दुसरा ग्रुप हा एचएस टेक डाऊन नावाचा होता. या ग्रुपमध्ये कुंद्रा कंटेट आणि कॉपीराईट विषयी चर्चा करायचा. हॉटशॉटवर जे अश्लील व्हिडीओ अपलोड केले गेले आहेत ते व्हिडीओ किंवा लिंक दुसऱ्या वेबसाईटवर उपलब्ध होऊ नये, असा प्रयत्न असायचा. याबाबत इथे चर्चा व्हायची.तर तिसरा ग्रुप हा एचएस टेक ऑपरेशन नावाचा होता. या ग्रुपमध्ये अभिनेता, अभिनेत्रीच्या निवडीविषयी चर्चा केली जायची.(Why should Raj Kundra's company send crores of money to a woman's bank account?)

तसेच त्यांच्या मानधनबाबतही चर्चा व्हायची. याशिवाय स्क्रिप्ट, कथा, पटकथा आणि लोकेशन बाबत चर्चा व्हायची.