राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा ?

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या हाती आता एक पीपीटी अर्थात पावर पॉईंट प्रेजेन्टेशन लागलं आहे.

राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा ?
Raj Kundra Case

राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा ?

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या हाती आता एक पीपीटी अर्थात पावर पॉईंट प्रेजेन्टेशन लागलं आहे.

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या हाती आता एक पीपीटी अर्थात पावर पॉईंट प्रेजेन्टेशन लागलं आहे. या पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये बॉलीफेम कंपनीकडून भविष्यात मिळणाऱ्या फायद्याविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राने बॉलीफेम सोबत चॅट करताना आपला प्लॅन बी देखील सांगितला होता.(So much for Raj Kundra's company in the future?)


क्राईम ब्रांचच्या हाती लागलेल्या पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये पुढच्या तीन वर्षांच्या फायद्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती. या प्रेजेन्टेशननुसार, 2021-22 या वर्षात 36 कोटी 50 लाख रुपयांचा ग्रॉस रेव्हेन्यू मिळणार होता. यापैकी 4 कोटी 76 लाख 85 हजार रुपयांचा फायदा होणार होता. तर 2022-23 या वर्षात तब्बल 73 कोटींचा ग्रॉस रेव्हेन्यू मिळणार होता. यामध्ये 4 कोटी 76 लाख 85 हजार रुपयांचा फायदा होणार होता. तर 2023-24 या वर्षात ग्रॉस रेव्हेन्यू हा तब्बल 14 कोटी 60 लाख इतका होणार होता. यातून 30 कोटी 42 लाख 1 हजार 400 रुपये इतका नफा मिळणार होता.

पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये पुढच्या तीन वर्षांच्या खर्चाबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. पण हा खर्च रुपयात नाही तर पाँडमध्ये सांगण्यात आला आहे, अशी माहिती आता समोर येत आहे. पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये असलेल्या माहितीनुसार 2021-22 या वर्षात 3 लाख पाँड खर्च येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर 2022-23 मध्ये 3 लाख 60 हजार पाँड तर 2023-24 या वर्षात 4 लाख 32 हजार पाँडचा उल्लेख करण्यात आला आहे.


अश्लील चित्रपट प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रा आणि रेयान थोरपे या दोघांची पुन्हा कस्टडी वाढवण्यात आली आहे. दोघांची 14 दिवसांची कोठडी वाढवण्यात आली आहे. दोघांच्या कस्टडीची मुदत आज संपणार होती. पण गुन्हे शाखेने कोर्टात पुन्हा कस्टडी मागून घेतली.  अजूनही बऱ्याच तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांवर या दोघांची चौकशी करणे बाकी आहे, असं गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलं आहे.


अश्लील चित्रपट प्रकरण जेव्हा फेब्रुवारीमध्ये समोर आलं आणि त्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या प्रकरणातील प्रमुख राज कुंद्राने अनेक माहिती लपवण्यासाठी आपला मोबाईल फोन बदलून मार्च महिन्यात नवीन फोन घेतला होता. म्हणून सध्या या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या मोबाईल फोनमध्ये काय काय होतं, ते रिट्राईव्ह किंवा अर्काईव्ह करण्यासाठी फार मेहनत करावी लागत आहे.(So much for Raj Kundra's company in the future?)

अनेक महत्त्वाचे डेटा पोलिसांच्या हाती लागणार नाहीत, असं म्हटलं जात आहे.