चौकशी दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीमध्ये मोठा वाद

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे सध्या खूप चर्चेत आहेत.

चौकशी दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीमध्ये मोठा वाद
Raj Kundra Case News

चौकशी दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीमध्ये मोठा वाद

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे सध्या खूप चर्चेत आहेत. 

बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा  हे सध्या खूप चर्चेत आहेत. अलीकडेच राजला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अश्लील चित्रपट प्रकरणात अटक केली आहे. राज कुंद्रा यांना 23 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यानंतर कोर्टाने त्यांचा रिमांड 27 जुलैपर्यंत वाढवला आहे.(Big argument between Raj Kundra and Shilpa Shetty during interrogation)

 शिल्पा शेट्टी यांची तिच्या घरी गुन्हे शाखेने सखील चौकशी केली. जिथे शिल्पा आणि राज एकमेकांच्या शेजारी बसले होते. दरम्यान, शिल्पा आणि राज यांच्यात जोरदार वादाचे वृत्तही ऐरणीवर आले आहे.फ्री प्रेस जनरलच्या वृत्तानुसार यावेळी शिल्पा शेट्टी यांचे राज कुंद्राशी बरेच वाद झाले. राजला संपूर्ण पोलीस पथकासह तेथे आणले गेले होते. घरात पोलीस आणि राज यांना पाहून शिल्पा शेट्टी पूर्णपणे हादरली होती. शिल्पा शेट्टी यांच्याशी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता असे म्हटले जाते आहे की, त्यावेळी अभिनेत्री आपला जबाब देतांना सुद्धा रडली. 


अशा परिस्थितीत आता राज कुंद्राच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. राज यांच्या कार्यालयात काम करणारे काही कर्मचारी राज यांच्या विरोधात या प्रकरणात पोलीस साक्षीदार बनले आहेत, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. ज्यामुळे पोलिसांचे हे प्रकरण आता अधिक दृढ झाले आहे.राज कुंद्रा सध्या तुरूंगात आहे. पोलीस हे प्रकरण आणखी ठोस बनवण्यात गुंतले आहेत. ज्यामुळे पोलीस या प्रकरणात सातत्याने आणि वेगाने काम करत आहेत.


राज कुंद्रा यांच्या कार्यालयाच्या भिंतीमध्ये एक गुप्त कपाट लपवले आहे, असे वियान इंडस्ट्रीतील एका कर्मचाऱ्याने शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सांगितले. यानंतर पोर्नोग्राफी प्रकरणात नवीन छापा टाकण्यात आला आहे. छापा टाकल्यानंतर केलेल्या तपासात ते रहस्यमयी कपाट पोलिसांना सापडले आहे. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी कपाट व काही बॉक्स ताब्यात घेतले आहेत.(Big argument between Raj Kundra and Shilpa Shetty during interrogation)

अश्लील चित्रपटांच्या या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे  कपाटातून सापडले आहेत.