राज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर

ठाण्याचा दौरा आटोपून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर
Raj Thackeray news

राज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर

ठाण्याचा दौरा आटोपून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

ठाण्याचा दौरा आटोपून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज संध्याकाळी ते पुण्यात पोहोचतील. तीन दिवसाच्या या दौऱ्यात ते एकूण 9 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तसेच मनसे सैनिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावणार आहेत.(Raj Thackeray on Pune tour again)

 पुणे महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने राज यांचा हा दौरा होत असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.राज ठाकरे आज ठाण्यात आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून काही मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी ते पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवस ते पुण्यात तळ ठोकून असणार आहेत. या तीन दिवसात ते नऊ मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.


 नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात ते शाखाध्यक्षांच्या मुलाखती घेणार आहेत. तसेच नवीन शाखाध्यक्षांच्या नियुक्त्या करणार आहेत. या दौऱ्यात ते एका दिवसात तीन मतदारसंघाचा आढावा म्हणजे तीन दिवसांत 9 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे पुण्यातील मनसे सैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शुक्रवारी शेवटचा आढावा घेऊन ते मुंबईला परतणार आहेत.


सोशल मीडियाचा वापर कमी करा.स्थानिक पत्रकारांना धरून राहा. तुमच्या कार्यक्रमाची माहिती त्यांना द्या. असे कार्यक्रम करा की स्थानिक पत्रकार देखील तुमच्यावर खुश असतील.प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्यात येणार आहे. प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देण्यात येणार. पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार. 25 दिवसांनंतर ठाण्यात देखील प्रभाग अध्यक्षपदाला पर्याय देणार.निवडणुकीच्या तयारीला लागा.ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक आहेत. 


वार्ड, शाखाध्यक्ष मला पाहिजेत. शाखाध्यक्षांची संख्या जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे.अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका. एकमेकांशी जोडून राहा. पक्षबांधणी करा. नव्यांनी आणि जुन्यांनी एकमेकांशी वाद करू नका. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी विचार करा. त्याच्यासाठी मेहनत करा.(Raj Thackeray on Pune tour again)

जे नवीन येतील, जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी येऊ नका.