राम कृष्णच्या मालकाला गंडा घालणाऱ्या सुधाकर शेट्टीवर गुन्हा दाखल
बनावट शिक्के व कागदपत्र बनवून सुधाकर कोरगा शेट्टी याने बँक ऑफ महाराष्ट्र मुरबाड शाखेमध्ये आपल्या नावाने खाते उघडून 36 लाखाच्यावर हॉटेल च्या नावाने पैशाचा अपहार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.

मुरबाड दिनांक 6 प्रतिनिधी लक्ष्मण पवार:
मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठेत सुप्रसिद्ध असलेले रामकृष्ण नावाचे हॉटेल असून रामकृष्ण हॉटेल च्या नावाने खोटे बनावट शिक्के व कागदपत्र बनवून सुधाकर कोरगा शेट्टी याने बँक ऑफ महाराष्ट्र मुरबाड शाखेमध्ये आपल्या नावाने खाते उघडून 36 लाखाच्यावर हॉटेल च्या नावाने पैशाचा अपहार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.(Ram Krishnas owner)
याबाबत हॉटेलचे मूळ मालक असलेले रामभाऊ बांगर यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी मुरबाड पोलीस ठाणे गाठून आपल्या हॉटेल च्या नावाने बोगस खाते उघडून सुधाकर कोरगा शेट्टी याने माझ्या नावाचा गैरवापर करून मला 36 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार मुरबाड पोलिस स्टेशनला सांगून सुधाकर शेट्टी विरोधात अर्ज दाखल केला होता.
याबाबत मुरबाड पोलिसांनी सखोल चौकशी करून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशाने सुधाकर शेट्टी याच्यावर अखेर भारतीय दंड संहिता 1860 अन्वये 420, 419, 464, 465, 467, 468 , 471 ,472, 473 ,193 कलमाअन्वये दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी गुन्हा नोंद केल्याने अखेर मराठी माणसाला न्याय मिळाला आहे.
त्याबद्दल रामभाऊ बांगर यांनी मुरबाड पोलिस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे व टीमचे आभार मानले आहे . त्यामुळे अन्यायाला योग्य न्याय मिळाला असल्याने जनसामान्यांकडून पोलीस खात्याचे अभिनंदन होत आहे.(Ram Krishnas owner)