मा.वि. रामपुरी येथे 21 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथील माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे तब्बल 21 वर्षानंतर सन 1999 - 2000 या एसएससी म्हणजे दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्रित आले. यांनी अतीशय थाटामाटात स्नेहमेळावा भरवला.

मा.वि. रामपुरी येथे 21 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
Rampuri Secondary School

मा.वि. रामपुरी येथे 21 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथील माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे तब्बल 21 वर्षानंतर सन 1999 - 2000 या एसएससी म्हणजे दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्रित आले. यांनी अतीशय थाटामाटात स्नेहमेळावा भरवला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथील माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे तब्बल 21 वर्षानंतर सन 1999 - 2000 या एसएससी म्हणजे दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्रित आले. यांनी अतीशय थाटामाटात स्नेहमेळावा भरवला.  शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी आनंदअश्रूना वाटा मोकळ्या करून दिल्या .आपले वय, पद, प्रतिष्ठा ,कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी पुणे, मुंबई परभणी ,औरंगाबाद अशा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून 21 वर्षानंतर मोठ्या उत्साहाने एकत्र जमले .त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता .अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटत आहोत त्यामुळे बऱ्याच जणाला एकमेकाला ओळखता येत नव्हते, नावे ऐकली की हसून एकमेकांची गळाभेट घेत होते. शाळेतील जुन्या आठवणी, गप्पा गोष्टी, धमाल-मस्ती, त्यावेळच्या स्नेह संमेलनातील आठवणी, शिक्षक दिनाच्या आठवणी, एकमेकांच्या टोपण नावाचे आठवणी, वाद विवाद यावर भरपूर चर्चा  रंगली होती.(Rampuri Secondary School)


या सर्व कार्यक्रमामध्ये दिवस कधी निघून गेला हे कुणालाही कळाले नाही. सर्व सुख दुःख विसरून ,सर्वजण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते.अध्यक्षीय भाषणामध्ये श्री तौर सर यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून आपल्या मुलांना सु - संस्कारीत करा, त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या, शिक्षणामुळे माणूस कसा मोठा होतो याची जिवंत उदाहरणे दिली. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देताना कोविड 19 चे नियम पाळण्याचा संकल्प करण्याचें आग्रहपुर्वक सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक तौर  हे  त्यावेळेचे गणित शिक्षक व प्रमुख अतिथी श्री विश्वनाथ दराडे (  इंग्रजी शिक्षक) व  श्री गंगाधर बोरडे  (विज्ञान शिक्षक ) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन जाधव एल जी सरांनी केले.(Rampuri Secondary School)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/