प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला रंगली राष्ट्रीय काव्यसंध्या

गढी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर गढी.जि. बीड महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा आणि यांच्या संयुक्त उपक्रम संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे

प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला रंगली राष्ट्रीय काव्यसंध्या
Republic Day celebrations

प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला रंगली राष्ट्रीय काव्यसंध्या

गढी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर  गढी.जि. बीड महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा आणि  यांच्या संयुक्त उपक्रम संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गढी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर  गढी.जि. बीड महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा आणि  यांच्या संयुक्त उपक्रम संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे तसेच महाराष्ट्र शासनाने १४ जानेवारी ते २९ जानेवारी २०२२ हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून साजरा करण्याचे घोषित केलेले आहे. याचे औचित्य साधून जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर  गढी.जि. बीड व महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील मराठी व हिंदी विभागाच्यावतीने राष्ट्रीय काव्यसंध्या चा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(Republic Day celebrations)

या काव्यसंध्येत डॉ.विनिता राणी (दिल्ली), डॉ. सुनील गायकवाड (चाळीसगाव), डॉ. ललित अधाने (गंगापूर) डॉ.मनोरमा गौतम (दिल्ली), प्राचार्य डॉ.अरुण पवार (परळी), डॉ. समाधान इंगळे( गेवराई ), डॉ. नरेश पिनमकर( निलंगा) यांनी आपल्या कविता ऐकवून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या राष्ट्रीय काव्यसंध्येत कवींनी  आपल्या सामाजिक, राजकीय, देशभक्तीपर, सांस्कृतिक, परिवर्तनवादी आणि वास्तवतेवर आधारित कवितांचे वाचन करून रसिकांची दाद मिळवली.


प्राचार्य डॉ. अरुण पवार यांनी आपल्या ‘अफू’ या कवितेतून “मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू ” आणि “काळोखाच्या राती माय चांदना देखीते” यासारख्या कवितेतून शेतकरी जीवनाचे वास्तव चित्र उभे केले. डॉ. समाधान इंगळे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य समोर ठेवून ‘लोकशाही ‘वर आधारित कविता गेय स्वरूपात सादर करून रसिकांची मने जिंकली. तर डॉ. मनोरमा गौतम यांनी “शहीद की शहादत” “कब्रिस्तान” आणि “२१वी सदीकी पुकार” या कविता सादर करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशप्रेमाची झालंरच जणू या काव्यसंध्येवर चढवली. कवी डॉ. नरेश पिनमकर यांनी कोरोणामुळे जगाची झालेली अवस्था मांडली.तर डॉ. ललित अधाने यांनी कोरोणामुळे लोकांना चांगल्या सवयी कशा लागल्या हे “बरं झालं तू आलास” या कवितेतून मांडल्या. तसेच देशात झालेल्या शेतकरी आंदोलनाचे वास्तव चित्रही कवी अधाने यांनी आपल्या काव्यातून मांडले. डॉ. विनिता राणी यांनी रोखठोक शैलीत आपल्या कविता सादर केल्या. तर आदिवासी कवी डॉ. सुनील गायकवाड यांनी ‘खान्देशी’ आणि ‘भिलोरी’ बोलीभाषेतील कवितेतून परिवर्तनवादी विचार मांडला.


या राष्ट्रीय काव्यसंध्येचे उद्घाटन निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी केले तर अध्यक्षस्थानी कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर, गढी  जि. बीड येथील प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे यांनी भूषविले. या काव्यसंध्येचा आस्वाद घेण्यासाठी उपप्राचार्य कँप्टन डॉ. चंद्रकुमार कदम हे ही उपस्थित होते. या बहारदार राष्ट्रीय काव्यसंध्येचे सूत्रसंचालन कवि डॉ. नरेश पिनमकर यांनी केले, प्रास्ताविक प्रा. रमेश रिंगणे यांनी तर आभार डॉ. भास्कर गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दोन्ही महाविद्यालयातील मराठी व हिंदी विभागातील प्राध्यापकांनी प्रयत्न केलेत. तर दूरदृश्य माध्यमाद्वारे झालेल्या या काव्यसंध्याचे तांत्रिक कार्य सिद्धेश्वर कुंभार यांनी पार पाडले.(Republic Day celebrations)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/