उत्तर मुंबई रीपाई जिल्हा अध्यक्षपदी सर्जेराव शिरसाठ यांच्या नावाची घोषणा, पक्षात बदल हवा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोराई बोरिवली याठिकाणी उत्तर मुंबईतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

उत्तर मुंबई रीपाई जिल्हा अध्यक्षपदी सर्जेराव शिरसाठ यांच्या नावाची घोषणा, पक्षात बदल हवा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा
Republican Party of India

उत्तर मुंबई रीपाई जिल्हा अध्यक्षपदी सर्जेराव शिरसाठ यांच्या नावाची घोषणा, पक्षात बदल हवा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोराई बोरिवली याठिकाणी उत्तर मुंबईतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. 

उत्तर मुंबई प्रतिनिधी संजय बोर्डे:

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोराई बोरिवली याठिकाणी उत्तर मुंबईतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये उत्तर मुंबई जिल्ह्यात गेली ३० वर्ष एकच जिल्हाध्यक्ष असल्या कारणाने जिल्ह्यामध्ये पक्षाचे संघटन व पक्षाची वाढ खुंटली आहे .अशी चर्चा झाली. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी ठराव घेऊन त्यानुसार सर्जेराव शिरसाट यांची उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वांच्या वतीने घोषणा करण्यात आली.(Republican Party of India)

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते तुळशीराम कांबळे व बि टी जाधव यांनी शिरसाट यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष घोषित केले. असा ठराव पारित करण्यात आला. या कार्यक्रमास श्रीराम खडसे, मधुकर भोरे, सुधिर थोरात, अशोक कांबळे, सुनील जाधव, गुरू खैरनार, सिद्धार्थ सारगे, निंबाजी सिरसाठ प्रभाकर बोबडे, बबन गमरे, संजय बोर्डे, तुळशीराम कांबळे, प्रभाकर कांबळे, दत्ता गाडे, करुणासागर सुगिरे, परमेश्वर ओव्हाळ, अंबादास बोर्डे, अशोक वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(Republican Party of India)