प्रभाग क्रमांक 03 मधून रिपाइंच्या वतीने विलास जोगदंड बीड नगर परिषद निवडणूक लढविणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाकडून युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशावरून बीड जिल्हा सचिव विलास जोगदंड हे प्रभाग क्रमांक 03 मधून बीड नगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती विलास जोगदंड यांनी पत्रकातून दिली आहे.

प्रभाग क्रमांक 03 मधून रिपाइंच्या वतीने विलास जोगदंड बीड नगर परिषद निवडणूक लढविणार
Republican Party of India

प्रभाग क्रमांक 03 मधून रिपाइंच्या वतीने विलास जोगदंड बीड नगर परिषद निवडणूक लढविणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाकडून युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशावरून बीड जिल्हा सचिव विलास जोगदंड हे प्रभाग क्रमांक 03 मधून बीड नगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती विलास जोगदंड यांनी पत्रकातून दिली आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड दि .18 .रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाकडून युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशावरून बीड जिल्हा सचिव विलास जोगदंड हे प्रभाग क्रमांक 03 मधून बीड नगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती विलास जोगदंड यांनी पत्रकातून दिली आहे.रिपाइंचे बीड जिल्हा सचिव विलास जोगदंड हे मागील बारा  वर्षापासून म्हणजे शालेय जीवनापासून एक निष्ठेने कसलीही अपेक्षा न करता पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिन-दलित दुबळ्या, शोषित, पीडित लोकांसाठी काम करत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांना रिपाईचे पेठ बीड अध्यक्ष पद दिले होते.(Republican Party of India)

नंतरच्या काळात त्यांच्या सामाजिक आणि पक्ष वाढीसाठी केलेल्या कामांची दखल घेत पप्पू कागदे यांनी विलास जोगदंड यांची जिल्हा सचिव पदी निवड केली.बीड जिल्हा सचिव पदाच्या माध्यमातून बीड तालुक्यासह जिल्ह्यातील समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करत आहेत. अनेक वेळा आंदोलने केली. शासनाच्या विरोधात पप्पू कागदे यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक मोर्चे काढले.त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून तुरुंगात देखील जावे लागले.


कोरोना काळात गोरगरीब जनतेला किराणा व धान्य वाटप करून सामाजिक हित जोपासले. घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व शेकडो गरीब कुटुंबांना हक्काचं घर मिळवून दिले. कोरोना बाधितांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवून समाजातील प्रश्न सोडवावे अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत होती. या मागणीची दखल घेत युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी रिपाइंच्या वतीने विलास जोगदंड यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 03 मधून निवडणूक लढवण्यास सांगितल्यामुळे पप्पू कागदे यांच्या आदेशावरून आपण निवडणूक लढवणार असल्याचे विलास जोगदंड यांनी पत्रकातून सांगितले आहे. विलास जोगदंड यांच्या सारखा सामाजिक कार्यकर्त्याला पप्पू कागदे यांनी उमेदवारी देऊन न्याय दिला असून येणाऱ्या निवडणुकीत विलास जोगदंड हे नक्कीच विजयी होतील आणि गोर गरीब वंचित बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करतील असा विश्वास स्थानिक भागातील नागरिकांना आहे.(Republican Party of India)