सेवाव्रती शंतनु जाधव हरपले

राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलायझर्स लि. या भारत सरकारच्या खत उद्योगातून निवृत्त झालेले मुख्य विपणन व्यवस्थापक शंतनु दत्तात्रय जाधव वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन पावले.

सेवाव्रती शंतनु जाधव हरपले
Retired Shantanu Jadhav

सेवाव्रती शंतनु जाधव हरपले

राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलायझर्स लि. या भारत सरकारच्या खत उद्योगातून निवृत्त झालेले मुख्य विपणन व्यवस्थापक शंतनु दत्तात्रय जाधव वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन पावले.

मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे:

राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलायझर्स लि. या भारत सरकारच्या खत उद्योगातून निवृत्त झालेले मुख्य विपणन व्यवस्थापक शंतनु दत्तात्रय जाधव वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन पावले. सतत हसत खेळत राहणारं, कर्तव्यदक्ष उमदं व्यक्तिमत्व अकाली काळाच्या पडद्याआड गेल्याने आरसीएफ परिवारात आणि परिसरात दुःखाची छाया पसरण सहाजिकच होत आणि घडलही तसच.सांगली जिल्ह्यातील पलुस गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले शंतनु जाधव यांनी कृषी विद्यापीठातून कृषी पदवी घेऊन आरसीएफ कंपनीत प्रथम भूमी परीक्षण प्रयोग शाळेत नोकरी स्वीकारली.

शेतकरी कुटुंबातून आल्याने बिकट परिस्थीतीची जाणीव आणि कष्ट करण्याची मनापासून तयारी यामुळे त्यांनी कंपनीत जबाबदारीने व निष्ठेने तसेच प्रामाणिकपणे काम केले. शेतकरी कुटुंबातुनच आल्याने कंपनी आणि शेतकरी यांच्यामधील विविध स्तरावरील दुवा ते अधिक प्रभावीपणे साधू शकले. परिणामी व्यवस्थापनानेही त्यांच्या सेवेप्रती योगदानाची व कामाची योग्य ती दखल घेऊन त्यांना अधिकाधिक विविध स्तरावरील उच्चस्तरातील जबाबदाऱ्या दिल्या. आपल्या भरीव कामातून आणि विपणन विभागात संघटितपणे काम करून त्यांनी व्यवस्थापनाचा आपल्यावरील विश्वास अधिक दृढ केला.

साहजिकच त्यांची सेवेतील हुद्यामधील वाढ वेळेत नियमित होत गेली आणि तसतशी जबाबदारीही वाढत गेली. व्यवस्थापनानेही वेळोवेळी प्रशस्तीपत्रे देऊन त्यांचा गुणगौरव केला. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कंपनीच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या कामाप्रतीच्या सेवेत त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. कृषी मेळावे आयोजन, शेतकरी सभा, दत्तकग्राम योजना, कंपनीच्या रासायनिक खतांचा प्रचार प्रसार, खतांचा संतुलीत वापर व त्याविषयी शेतकऱ्यांमधे जागृती अशा कंपनीच्या विविध प्रकारच्या उपक्रमांद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र तर प्रयत्न केलेच त्याचबरोबर महाराष्ट्रातील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत दांडगा जनसंपर्क तयार केला.

त्याचा लाभ कंपनीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वासही  होऊन कंपनीचा एक आदर्श प्रतिनीधी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमधे त्यांचा नावलौकीक झाला.मनमिळावू विनयशील स्वभाव, कामावरील द्रुढनिष्ठा व व्यवहारातील प्रामाणिकपणा, सकारात्मक वृत्ती आणि प्रत्येकास वेळकाळ न बघता मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची तयारी यामुळे कंपनीतील सहकाऱ्यांप्रमाणेच व्यवस्थापनामधेही त्यांनी स्वतःचे असे एक अढळ स्थान निर्माण केले होते.

आपली नोकरी यशस्वीपणे सांभाळून त्यांनी कुटुंबाकडेही योग्य तऱ्हेने लक्ष देऊन कुटूंबाचीही व्यवस्थित घडी बसविली. याबरोबरच समाजसेवेचीही त्यांना प्रचंड आवड होती. आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम बरोबरच अनेक समाजसेवी संस्थांमधून त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे. सुसंस्कृत घरात जन्म झाला असल्याने ते स्वतः धार्मिक प्रवृत्तीचे होते. पंढरीच्या पांडुरंगावर त्यांची आगाध श्रद्धा होती. दरवर्षी आषाढी एकादशीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पंढरपूर वारीसोबत तो पायी सहभागी होत. तसेच संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबावर घडविले. अशा या सेवाव्रतीस शतशः प्रणाम! आणि भावपूर्ण श्रद्धांजली!