रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकारच्या वतीने पालघर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम

पालघर जिल्हयात रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकारच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम मंगळवार दि.१९ ऑक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आले होते.

रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकारच्या वतीने पालघर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम
Rotary Club of Mumbai

रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकारच्या वतीने पालघर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम

पालघर जिल्हयात रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकारच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम मंगळवार दि.१९ ऑक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आले होते.
पालघर प्रतिनिधी जयेश घोडविंदे:
पालघर जिल्हयात रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकारच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम मंगळवार दि.१९ ऑक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आले होते .यामध्ये वाडा तालुक्यातील वावेघर येथे अपंगांना व्हील चेअर  वाटप करण्यात आले तर  कुडुस याठिकाणी शिवण यंत्र वाटप करून वोकेशनल सेंटरची सुरुवात केली. पहिल्या शंभर महिलांना सर्ट्रीफीकेट देऊन त्यातील इछुक महिलांना पुढे व्यवसाय मार्गदर्शन दिले जाईल असे प्रेसिडेंट नंदी मॅडम नी प्रकल्पाचे उद्घाटन करते वेळी सांगितले.(Rotary Club of Mumbai)

विक्रमगड तालुक्यातील उतवली येथील महिला नैसर्गिक बांबू वस्तू निर्मिती सेंटरला बांबू स्ट्रीपिंग मशीन भेट दिले असून त्याने तेथील महिलांना कामात खूप मदत होईल अशी माहिती प्रोजेक्ट डायरेक्टर सोनाली चितळे यांनी दिली.सदर  मुंबई क्लब ऑफ रोटरी कलाकार  वतीने सातत्याने ह्या प्रकल्पाला मार्गदर्शन मिळत असते. बांबू पासून आकाश कंदिल आणि नानाविध गोष्टी ह्या उतावली गावात बनवल्या जातात.ह्या प्रकल्पात आदिशक्ती  मंडळाचे कमलाकर पाटील व जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नरेश जाधव,सचिव जयेश घोडविंदे,सुरज जाधव व वैभव भोईर यांनी विशेष मेहनत घेतली.(Rotary Club of Mumbai)