शेतकरयांना जास्त भाव देण्याचं आमिष दाखवित १९ लाखांचा गंडा  

भामट्या व्यापाऱ्याला महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या.....

शेतकरयांना जास्त भाव देण्याचं आमिष दाखवित १९ लाखांचा गंडा   
Rs 19 lakh scam to lure farmers to pay higher prices

शेतकरयांना जास्त भाव देण्याचं आमिष दाखवित १९ लाखांचा गंडा

 

भामट्या व्यापाऱ्याला महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण (kalyan) :   फळ बागयातदार शेतकऱ्यांना फळ मालाला जास्त भाव देण्याचं आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या  एका  ठेकसेन व्यापाऱ्याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. अस्लम शेख असे या ठकसेन व्यापाऱ्यांचे नाव असून या ठकसेनाने राज्यातील किती शेतकऱ्यांना फसवले आहे, त्याचा तपास पोलीस करत आहेत.

कोरोना (corona) पार्श्वभूमीवर तसेच निसर्गच्या लहरी परिस्थिती मुळे शेतकरी  पुरता हैराण झाला असतानाच कल्याणात (kalyan) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये राहणारा आरोपी अस्लम शेख हा ठकसेन व्यापारी शेतकऱ्यांकडून विविध फळे घाऊक बाजार पेक्षा १० रुपये  किलो चढ्या भावाने घेऊन विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात फळे घेऊन शेतकऱ्यांना चेक द्यायचा.

जुन्नर येथील शेतकरी संतोष बापु भोर यांच्याशी संपर्क साधत  अस्लम शेख याने १८ जुलै पासुन २५ ऑगस्ट दरम्यान ३३ टन ५७६ किलो डाळिंबाचा माल उचलला सुरूवातीस ठरल्याप्रमाणे उचललेल्या डाळिंब मालाची रोख रक्कम देत भोर यांचा विश्वास संपादन केला. पुढे चेक दिले असता हे चेक बँकेत बाऊन्स झाले. यामध्ये भोर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी पोलीस अधिकारी प्रकाश पाटील यांना तपास दिला. या तपासात भयानक वास्तव समोर आले. कल्याणमध्ये राहणाऱ्या अस्लम याच्या विरोधात राज्यातील काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याने अनेक शेतकऱ्यांना अशा प्रकारे फसवले आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_______

Also see : सुराज कुटे यांच्या 'सिनटीला' ची विश्वस्तरावरील पुरस्कारावर मोहर

https://www.theganimikava.com/Sealed-at-the-Sintila-Chi-World-Award-by-Suraj-Kute