गेवराई येथील रुद्रेश्वर अर्बन बँक शाखेच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

गेवराई येथील रुद्रेश्वर अर्बन बँक येथे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला उद्योजकांना बँकेच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली.

गेवराई येथील रुद्रेश्वर अर्बन बँक शाखेच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
Rudreshwar Urban Bank

गेवराई येथील रुद्रेश्वर अर्बन बँक शाखेच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

गेवराई येथील रुद्रेश्वर अर्बन बँक येथे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला उद्योजकांना बँकेच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई येथील रुद्रेश्वर अर्बन बँक येथे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला उद्योजकांना बँकेच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. महिलांनी आपल्या  व्यवसायामध्ये सक्षम होण्यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज रुपी अर्थ सहाय्य कसे मिळवायचे व आपला व्यवसाय कसा वाढवायचा याविषयी बँकेच्या संचालिका सारिका नवनाथ जाधव यांनी मार्गदर्शन केले. गेवराई शाखेच्या माध्यमातून आज पर्यंत 40 महिला बचत गटांना कर्ज देण्यात आले आहे.(Rudreshwar Urban Bank)

तसेच ज्या महिला स्वतः छोटे छोटे व्यवसाय म्हणजेच शिवणकाम, कटलरी,भाजीपाला विक्री, व किराणा दुकाने चालवतात त्यांनाही या शाखेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून व्यवसाय वाढवण्यास अर्थ सहाय्य केले आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, उद्योजक,नोकरदार, यांनाही या शाखेच्या माध्यमातून कर्ज रुपी अर्थसाह्य केलेले आहे. याबरोबर महिलांना दररोज ची छोटी सेव्हिग कशी करायची व आपला पैसा वाचून भविष्यासाठी कसा उपयोग करायचा याची माहिती देऊन बँकेच्या सेव्हिग,कंरट, डिपॉझिट स्कीम, आर, डी स्कीम, विविध ठेवीच्या योजना सांगून महिलांनी व व्यापारी वर्ग उद्योजक यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. बँकेचे चेअरमन गोविंद साबळे, व्हा.चेअरमन नितेश जगताप, एम.डी नवनाथ जाधव, शाखा व्यवस्थापक महेश ढवळे, संचालिका सारिका जाधव,पूजा साबळे, भागवत मॅडम, गाडे मॅडम आदींची उपस्थिती होती.(Rudreshwar Urban Bank)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/