शिक्षक नितिन आहेर व पोलीस प्रदिप विटकर यांनी वाढदिवसानिमित्त रूग्णांना केले बिस्किट वाटप
सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षक नितिन आहेर व पोलीस नाईक प्रदिप विटकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे दि १६ आक्टोंबर वार शनिवार रोजी वाटप केले आहे.

मोखाडा प्रतिनिधी माधुरी आहेर:
मोखाडा - सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षक नितिन आहेर व पोलीस नाईक प्रदिप विटकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे दि १६ आक्टोंबर वार शनिवार रोजी वाटप केले आहे.नितीन आहेर व विटकर हे नेहमीच स्वच्छता अभियानासारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी,स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी तुषार माळी व तत्कालीन गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नितिन आहेर यांनी स्वच्छता अभियानात भरीव काम केले आहे.(Rural Hospital Mokhada)
तसेच पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीचे आहेर हे सदस्य असून तंटामुक्ती साठी सहकार्य करत असतात.तर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सतीश गवई यांच्यासमवेत नितिन आहेर यांनी गावागावात जाऊन कोरोना जनजागृती केली आहे.त्यामुळे नितिन आहेर यांना डि वाय एस पी प्रशांत परदेशी यांच्या हस्ते कोरोना काळातील कामगिरी बद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.(Rural Hospital Mokhada)