रिटेल ग्राहकांसाठी SBI चा धमाका

सोमवारी बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्व चॅनेलवर कार कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

रिटेल ग्राहकांसाठी SBI चा धमाका
SBI Interest Rate

रिटेल ग्राहकांसाठी SBI चा धमाका

सोमवारी बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्व चॅनेलवर कार कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. 

 देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ने सणासुदीच्या काळात आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स जारी केल्यात. सोमवारी बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्व चॅनेलवर कार कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहकांना कारसाठी एकूण किमतीच्या  90 % पर्यंत कर्ज मिळेल.या व्यतिरिक्त बँक YONO APP द्वारे अर्ज करणाऱ्या ग्राहकांना 0.25 टक्के विशेष व्याज सवलत देईल.(SBI Interest Rate)

योनो हे एसबीआयचे मोबाईल बँकिंग APP आहे. YONO च्या ग्राहकांना सुरुवातीला 7.5 टक्के दराने कार कर्ज उपलब्ध होईल, असे निवेदनात म्हटलेय. याशिवाय बँक आपल्या गोल्ड लोनच्या ग्राहकांना 0.75 टक्के कमी व्याज देत आहे. A ग्राहक 7.5 टक्के वार्षिक व्याजदराने बँकेच्या सर्व सूत्रांकडून कर्ज घेऊ शकतील. YONO द्वारे गोल्ड लोनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.वैयक्तिक आणि पेन्शन कर्ज ग्राहकांना बँकेने सर्व चॅनेलवर प्रक्रिया शुल्क 100% माफ करण्याची घोषणा केलीय.


 कोविड 19 महामारीविरुद्ध लढाई लढणाऱ्या लोकांसाठी वैयक्तिक कर्जावर 0.50 टक्के विशेष सवलत दिली जाईल, जसे की आरोग्यसेवा कर्मचारी ही ऑफर लवकरच कार आणि गोल्ड लोनसाठी देखील लागू होईल.स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त एसबीआय किरकोळ ठेवीदारांसाठी विशेष ‘प्लॅटिनम मुदत ठेव’ ऑफर करत आहे. या अंतर्गत ग्राहकांना 15 ऑगस्ट 2020 ते 14 सप्टेंबर 2021 पर्यंत 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 0.15 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाणार आहे.(SBI Interest Rate)

एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक सीएस शेट्टी म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की, या ऑफरमुळे ग्राहकांना त्यांच्या कर्जावर अधिक बचत मिळेल.”