एस टी महामंडळ संपकरी कर्मचारी यांची राज्यसरकार दिशाभूल करतेय- प्रकाश सोनसळे

बीड  एस टी कर्मचारी यांच्या आंदोलनास  धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर पांठीबा गेल्या अनेक दिवसांपासून एस टी कर्मचारी हे आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे.

एस टी महामंडळ संपकरी कर्मचारी यांची राज्यसरकार दिशाभूल करतेय- प्रकाश सोनसळे
ST Corporation

एस टी महामंडळ संपकरी कर्मचारी यांची राज्यसरकार दिशाभूल करतेय- प्रकाश सोनसळे

बीड  एस टी कर्मचारी यांच्या आंदोलनास  धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर पांठीबा गेल्या अनेक दिवसांपासून एस टी कर्मचारी हे आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  एस टी कर्मचारी यांच्या आंदोलनास  धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर पांठीबा 
गेल्या अनेक दिवसांपासून एस टी कर्मचारी हे आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे परंतु त्यांच्या या न्याय हक्कासाठी सरकार एस टी कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी समोर येत नाही एस टी कर्मचारी यांची प्रमुख मागणी जो पर्यंत एस टीचे शासनात विलनिकरण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचारी यांनी घेतला आहे  बीड येथे एस टी कर्मचारी आंदोलनात धनगर समाज युवा मल्हार सेना पदाधिकारी यांना घेऊन या आंदोलनात सहभागी झालोत गेल्या महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनकरांचा आजचा ३२ वा दिवस आहे कर्मचारी आपले कुटुंबासहित या आंदोलनात सहभागी झाले आहेत तरी या राज्य सरकारने त्वरित एस टी महामंडळाचे विलनिकरण करून सरकारने  एस टी महामंडळाचे कर्मचारी यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन हे तिव्र करु असा इशारा धनगर समाज युवा मल्हार सेना राज्य सरसेनापती प्रकाश सोनसळे यांनी दिला आहे.(ST Corporation)

अखंड महाराष्ट्रातील धनगर समाज युवा मल्हार सेना प्रत्येक पदाधिकारी हा एस टी कर्मचारी यांच्या आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा देतील असेही प्रकाश भैय्या सोनसळे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.या पुढे कधीही एस टी कर्मचारी यांना अडचण आली तर धनगर समाज युवा मल्हार सेना आपली अडचण दूर करेल अशी ग्वाही देतो.या आंदोलनाला धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य यांच्या वतीने एस टी महामंडळाचे कर्मचारी यांना जाहीर पाठिंबा देत आहे.धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती प्रकाश सोनसळे यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.

यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज सिराम, धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती प्रकाश सोनसळे , अशोक पांढरे  भाऊसाहेब बीडगर धनगर समाज युवा मल्हार सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष(नाशिकर),  महादेव राहींज मराठवाडा नेते धनगर समाज युवा मल्हार सेना ,समाधान सिराम संघटक धनगर समाज युवा मल्हार सेना बीड, नारायण भोंडवे सरपंच डोमरी , सोपान गावडे सरपंच मादळमोही, शितल मतकर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी ,पैलवान मिसकर (नाशिककर), पैलवान हर्षाली मिसकर (युरोप रिटन), बरकडे प्रविण उघडे, रामदास ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य, अशोक करांडे ग्रामपंचायत सदस्य, संजय करांडे ग्रामपंचायत सदस्य बंगाली पिंपळा, माऊली मार्कड  मार्केडवाडी,प्रा.नजान ,दिपक मदने, बीड येथील सर्व एस टी कर्मचारी आदी उपस्थित होते.(ST Corporation)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link