तांदुळवाडी येथे पोटनिवडणुक संदर्भात सफाळे पोलीस ठाण्यात तर्फे बैठक

पालघर "जिल्हा परिषद" व "पंचायत समिती" पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सफाळे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी संदीप कहाळे यांची ग्रामपंचायत कार्यालय तांदूळवाडी येथे तांदुळवाडी,लालठाणे,खडकोली इत्यादी गावांची संयुक्त बैठक संपन्न झाली .

तांदुळवाडी येथे पोटनिवडणुक संदर्भात सफाळे पोलीस ठाण्यात तर्फे बैठक
Safale Police Station

तांदुळवाडी येथे पोटनिवडणुक संदर्भात सफाळे पोलीस ठाण्यात तर्फे बैठक

पालघर  "जिल्हा परिषद" व "पंचायत समिती" पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सफाळे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी संदीप कहाळे  यांची  ग्रामपंचायत कार्यालय तांदूळवाडी येथे तांदुळवाडी,लालठाणे,खडकोली इत्यादी गावांची संयुक्त बैठक संपन्न झाली.

शनिवार, दिनांक 25/09/2021 रोजी आगामी पालघर  "जिल्हा परिषद" व "पंचायत समिती" पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सफाळे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी संदीप कहाळे  यांची  ग्रामपंचायत कार्यालय तांदूळवाडी येथे तांदुळवाडी,लालठाणे,खडकोली इत्यादी गावांची संयुक्त बैठक संपन्न झाली.(Safale Police Station)


   सदर बैठकीत  उपस्थित ग्रामस्थांना निवडणुकी दरम्यान "कोरोना" विषाणूचा प्रादुर्भाव,संसर्ग व संक्रमण होणार नाही याकरिता उपाययोजना करून स्वतःची काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या . त्याच बरोबर उपस्थित कार्यकर्ते व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे "मतदार" आणि "मतदाना" संदर्भातील प्रश्न व अडचणी ऐकून घेतल्या. दरम्यान,त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण आणि समाधान करत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या "आचार संहिते"चे योग्य पालन करण्याबाबत सर्वांना सूचना केल्या.

तथापी, निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखत आगामी निवडणूक शांततेत व निर्भीड आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे सफाळे पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात आले.सदर मिटिंग करिता सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कैलास शेळके,कॉन्स्टेबल राजेंद्र घुगे तसेच तांदूळवाडी, लालठाणे, खडकोली गावचे पोलीस पाटील सुजित पाटील, संदेश पाटील, शरद सातवी उपस्थित होते.(Safale Police Station)