करोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषध संशमनी वटी गोळ्यांचे (Samsamani vati) मोफत  वाटप पालघर येथे विविध भागात  करण्यात आले

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून ( 75 वर्षे ) आयुष मंत्रालय भारत सरकार च्या संयोगाने पालघर येथे मागील आठवड्यापासून करोना काळात रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध संशमनी वटी गोळ्यांचे मोफत वाटप

करोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषध संशमनी वटी गोळ्यांचे (Samsamani vati) मोफत  वाटप पालघर येथे विविध भागात  करण्यात आले
Samsamani Vati pills

करोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषध संशमनी वटी गोळ्यांचे (Samsamani vati) मोफत  वाटप पालघर येथे विविध भागात  करण्यात आले

भारतीय  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून  ( 75 वर्षे ) आयुष मंत्रालय भारत सरकार च्या संयोगाने  पालघर येथे मागील आठवड्यापासून करोना काळात रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध संशमनी वटी गोळ्यांचे मोफत वाटप 

रविंद्र घरत पालघर:

पालघर दिनांक 23 जानेवारी 2022 भारतीय  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून  ( 75 वर्षे ) आयुष मंत्रालय भारत सरकार च्या संयोगाने  पालघर येथे मागील आठवड्यापासून करोना काळात रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध संशमनी वटी गोळ्यांचे मोफत वाटप  ,नगराध्यक्ष तसेच बि ए एम एस  ग्रॅज्युएट असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला  काळे यांच्यामार्फत  करण्यात येत आहे.(Samsamani Vati pills)


 ह्या गोळ्या पालघर साठी उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्याचे   असिस्टंट डायरेक्टर डॉक्टर श्री आर गोविंद रेड्डी ( MD, DPS , Phd  आयुर्वेद ) यांचा पुढाकार व मोलाचे सहकार्य आहे.आज संशमनी वटी  आयुर्वेदीक गोळ्या वाटण्यासाठी व covid-19 च्या काळात प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेद वर आधारित आहार आणि जीवनशैली याची माहिती देण्यासाठी आयुष्य मंत्रालयातर्फे रिसर्च ऑफिसर  डॉक्टर  श्री कुलदीप चौधरी  ( MD बालरोगतज्ञ ) ,  रिसर्च ऑफिसर डॉक्टर श्री शाम  काळे ( MD कायचिकित्सक ) व त्यांचे सहकारी  हे उपस्थित होते.


 करोना  पासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी व्हॅक्सिनेशन अत्यंत गरजेचा आहे सर्वांनी करोना प्रतिबंधक  लसीचे  दोन  डोस  घ्यावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला काळे यांनी केले ,करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळून येत आहेत म्हणून स्वताची व कुटुंबातील व्यक्तीची काळजी घेण्यासाठी , वारंवार कोमट पाणी प्यावे ,गोल्डन मिल्क (गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून) दिवसातून एकदा किंवा दोनदा सेवन करावे , हळद जिरे धने सुंठ लसून इत्यादी मसाले आहारात वापरावे ,ताजे आणि सहज पचण्यास हलके असे अन्न सेवन करावे, आवळ्याचे फळ कोणत्याही स्वरूपात नियमित सेवन करावे ,दररोज किमान 30 मिनिटे योगासनं प्राणायाम आणि ध्यान करण्याचा सराव करावा, सात-आठ तास  झोप घ्यावी आणि दिवसा झोपणे टाळावी , चिमूटभर हळद कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात, अशा अनेक बाबी बाबत डॉक्टर उज्ज्वला  काळे ह्यानी  मार्गदर्शन केले.

कुलदीप चौधरी संशमनी वटी या गोळ्या कशा प्रकारे घ्याव्यात याची माहिती दिली, 18 वर्षावरील व्यक्तींनी दिवसातून दोन वेळा   (नास्ता ,भोजन  करुन) दोन दोन गोळ्या कोमट पाण्यासोबत घ्याव्या ,तसेच बारा ते अठरा वर्षांमधील मुलांनी दिवसातून एक एक गोळी दोन वेळा कोमट पाण्यासोबत घेणे असे सांगितले.आयुष्य मंत्रालयचे पालघर मध्ये  50000/-  गोळ्यांच्या डब्या वाटण्याचा मानस असल्याचे सांगितले ,तसेच कुपोषणावरही  आयुष्य मंत्रालय पालघर जिल्यात काम करणार असल्याचे सांगीतले.हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पालघर संस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष केदार काळे यांचे मोलाचे सहकार्य होते.(Samsamani Vati pills)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/