विद्यार्थी वाचन ,लेखनआणि अंक गणितात तरबेज करणे हेच शिक्षकांचे ध्येय असावे- केंद्रप्रमुख ए. तु. कराड

परळी तालुक्यातील नागापूर येथे संत तुकाराम विद्यालयात या परिसरातील शिक्षकांची" शिक्षण परिषद"घेण्यात आली त्याप्रसंगी बोलत होते.

विद्यार्थी वाचन ,लेखनआणि अंक गणितात तरबेज करणे हेच शिक्षकांचे ध्येय असावे- केंद्रप्रमुख ए. तु. कराड
Sant Tukaram Vidyalaya

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी तालुक्यातील नागापूर येथे संत तुकाराम विद्यालयात या परिसरातील शिक्षकांची" शिक्षण परिषद"घेण्यात आली त्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय मुख्याध्यापक चाटे, संत तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक सोळंके सर, बालाघाट विद्यालय चे मुख्याध्यापक कराड, दौनापूर शाळेचे मुख्याध्यापक निकते, वानटाकळी चे मुख्याध्यापक कवडेवार ,रमाबाई आंबेडकर चे मुख्याध्यापक शिर्के हे उपस्थित होते. प्रथमतः ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर
"आता पेटवू सारे रान ,विकसनाच्या वाटेवरती लावू पणाला प्राण."प्रेरणादायी गीत घेतले.सुलभक म्हणून गर्जे बाळासाहेब यांनी "बालविवाह निर्मूलन"या संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.(Sant Tukaram Vidyalaya)

निपुण भारत या अंतर्गत भाषा व गणित या विषयावर महाजन किरण यांनी  विद्यार्थी प्रगत कसे करायचे हे मुद्देसूद मांडणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चाटे सर यांनी केले व सूत्रसंचालन नेहरकर सर यांनी केले.या परिषदेत बोलताना केंद्रप्रमुख कराड ए. तु. यांनी पाहिली वर्गास जो शिकवितो त्यांचे कौतुक केले.
कारण जो पाहिली शिकवितो तो शिक्षक मातृत्व जपणारा असावा लागतो. असं मत व्यक्त केले.

मराठी अक्षरें शिकवण्यासाठी बालमानस शास्त्र अवगत असावे लागते. समरूप अक्षरे एकत्र करून एक धडा किंवा पाठ तयार करावा लागतो. भाषा पेटीचा उपयोग जो शिक्षक करतो तो लवकर यशस्वी होतो.बडबडगीते जास्तीत जास्त पाठांतर करून मुलांना शब्द संपत्ती द्यावी लागते.असे विचार ए तु कराड यांनी व्यक्त केले.वाण टाकळी चे शिक्षक माडजे सरांनी आभार
प्रदर्शन केले.या परिषदेस पन्नास पेक्षा अधिक शिक्षक उपस्थित होते.(Sant Tukaram Vidyalaya)