ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मा विश्वनाथ पंडित यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

चिपळूण येथे राहणारे व ठाणे येथे देखील आपल्या मुंबईतील घरी काही वेळा वास्तव्य करणारे आमचे मार्गदर्शक मित्र,ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मा विश्वनाथ पंडित यांचा १८ सप्टेंबर म्हणजे वाढदिवस.आज पंडित साहेब ७२ वर्ष पूर्ण करून ७३ व्या वर्षात प्रदार्पण करीत.

ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मा विश्वनाथ पंडित यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Senior Newspaper Writer Vishwanath Pandit

ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मा विश्वनाथ पंडित यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

चिपळूण येथे राहणारे व ठाणे येथे देखील आपल्या मुंबईतील घरी काही वेळा वास्तव्य करणारे आमचे मार्गदर्शक मित्र,ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मा विश्वनाथ पंडित यांचा १८ सप्टेंबर म्हणजे वाढदिवस.आज पंडित साहेब ७२ वर्ष पूर्ण करून ७३ व्या वर्षात प्रदार्पण करीत.

मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे:

चिपळूण येथे राहणारे व ठाणे येथे देखील आपल्या मुंबईतील घरी काही वेळा वास्तव्य करणारे आमचे मार्गदर्शक मित्र,ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मा विश्वनाथ पंडित यांचा १८ सप्टेंबर म्हणजे वाढदिवस.आज पंडित साहेब ७२ वर्ष पूर्ण करून ७३ व्या वर्षात प्रदार्पण करीत असले तरी त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचा उत्साह तसुभरही कमी झालेला जाणवत नाही.मी कधी कधी विचार करतो की एवढी ऊर्जा या माणसात येते कुठून ? तर त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी १९७० सलापासून जोपासलेला वृत्तपत्र लेखनाचा छंद आजही शाबूत ठेवलेला आहे.आताही दररोज कोणतेही मराठी वृत्तपत्र उघडले की विश्वनाथ पंडित यांचे पत्र हमखास दिसणारच.आतापर्यंत त्यांची तीन हजारांहून अधिक पत्र प्रसिद्ध झालेली असून यातील काही निवडक पत्रांचे पुस्तक काढण्याचा मनोदय मध्यंतरी पंडित साहेबांनी माझ्याकडे बोलून दाखविला.(Senior Newspaper Writer Vishwanath Pandit)

तो त्यांचा संकल्प तडीस जावा यासाठी आम्ही काही पत्रलेखक नक्कीच प्रयत्नशील राहु,कारण मित्राच्या मदतीला येणं व एखाद्या चांगल्या कामात त्याचा साक्षीदार-भागीदार होणं यापेक्षा वेगळं पुण्य ते काय.पंडित साहेबांनी त्यांच्या तरुण वयात लोकप्रिय मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघटनेची प्रमुख कार्यवाह व कार्याध्यक्ष यांसारखी अनेक मानाची पद भूषविलेली आहेत.अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले असून आपल्या पत्रलेखनाच्या माध्यमातून त्यानी अनेक नागरी समस्यांना वाचा फोडलेली आहे.मध्यंतरी आम्ही अभिजित राणे युथ फौंडेशन च्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेत विश्वनाथजी प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे विजेते ठरले होते व खास चिपळूणहुन ते गोरेगाव येथील कार्यक्रमासाठी उपस्थित होते.ठाणे महानगरपालिकेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गुणीजन कामगार पुरस्कार तर दिलाच पण मुंबई वृत्तपत्र लेखक संघटनेने देखील त्यांचा यथोचित सन्मान करीत त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला.

सिटी बँक या परदेशी बॅंकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या पंडित साहेबांची मुलगी व जावई दोघेही डॉक्टर असून चिपळूणमध्ये सर्वसामान्यची सेवा करीत आहेत..पंडितजी लवकरच त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सर्वांना बोलावतीलच व त्यानंतर त्यांनी शतक ठोकावे व तोपर्यंत त्यांना निरोगी आयुष्य लाभावे हिच मनापासून प्रार्थना आज त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी गणरायाच्या चरणी करतो.(Senior Newspaper Writer Vishwanath Pandit)