विविध उपक्रमांनी लायन्स क्लब गणेशखिंडचा सेवा सप्ताह संपन्न...
लायन्स क्लब ही जगभर पसरलेली सामाजिक संघटना आहे.यांच्या विविध कार्यात २ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर असा सेवा सप्ताह साजरा करण्यात आला....

विविध उपक्रमांनी लायन्स क्लब गणेशखिंडचा सेवा सप्ताह संपन्न...
पुणे (Pune) : लायन्स क्लब ही जगभर पसरलेली सामाजिक संघटना आहे.यांच्या विविध कार्यात २ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर असा सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.यामध्ये विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले. यात जितो कोविड सेंटर पुणे येथे व्हेंटिलेटर प्रदान करून सप्ताह प्रारंभ करण्यात आला.याचे लोकार्पण लायन्सचे गव्हर्नर अभय शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर कोरोना रुग्णांना १००० औषधी किट वाटण्यात आली.तसेच रिक्षामध्ये सुरक्षेसाठी पार्टिशन शिट वाटप,मास्क वाटप,शालेय गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाथी मोबाइल,ससून रुग्णालयाला ५०००० व्हिटमीन सी गोळ्या वाटप,चष्मा वाटप,तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात लायन्स क्लब गणेशखिंडचे अध्यक्ष ज्योतीकुमार आगरवाल,सचिव महेंद्र गदिया,माजी अध्यक्ष शाम खांडेलवाल,दीपक लोया,कुरेश पोलन,अजय जैन तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
___________
Also see : माणुसकीचे नाते दृढ करणाऱ्या सेवावृत्तींचा सन्मान प्रेरणादायी