राज कुंद्रा प्रकरणानंतर मोठा ब्रेक घेत शिल्पा शेट्टी कामावर परतली

दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

राज कुंद्रा प्रकरणानंतर मोठा ब्रेक घेत शिल्पा शेट्टी कामावर परतली
Shilpa Shetty News

राज कुंद्रा प्रकरणानंतर मोठा ब्रेक घेत शिल्पा शेट्टी कामावर परतली

दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही मंगळवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही मंगळवार म्हणजेच 18 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी डान्स रिअलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये जज म्हणून दिसली होती.(Shilpa Shetty News)

शिल्पाचा पती राज कुंद्राला काही काळापूर्वी अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राजच्या अटकेनंतर शिल्पा शोमध्ये दिसली नाही. मात्र, आता तीन आठवड्याच्या गॅप ननंतर शिल्पा शोमध्ये परतत आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये शिल्पा शेट्टीच्या जागेवर कधी सोनाली बेंद्रे तर कधी जेनेलिया-रितेश दिसले होते. दर आठवड्याला काही सेलेब्स शिल्पा शेट्टीची जागा घ्यायचे. पण आता निर्मात्यांना शिल्पाची जागा घेण्यासाठी कोणाचीही गरज भासणार नाहीय. ती आता या शोमध्ये परतत आहे.अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने काबूलवर कब्जा केला आहे. सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती वाईट आहे. लोकांना देश सोडून जायचे आहे. काबूल विमानतळावर मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत. प्रत्येकजण याचा तीव्र निषेध करत आहे.

शबाना आझमी, जावेद अख्तर यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना जावेद अख्तर यांनी अमेरिकेवर हल्लाबोल केला आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. तालिबानच्या परिस्थितीबाबत अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. एवढेच नाही तर अफगाणिस्तानचे लोक मोठ्या संख्येने स्वतःसाठी सुरक्षित आश्रयाच्या शोधात देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानच्या या परिस्थितीवर बॉलिवूडमधून सतत प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि सोशल मीडियावर सामाजिक चिंतांवर आवाज उठवणारे जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले आहे. जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जा केल्याबद्दल महासत्ता अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर आपला राग व्यक्त केला आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जानंतर सोशल मीडियावर व्यक्त झाली कंगना, म्हणाली ‘मोदीजी नसतील तर…’
तालिबानने अफगाणिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. एक निवेदन जारी करताना ते म्हणाले की, देशाला रक्तपात करण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी देश सोडला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा असल्याने परिस्थिती गंभीर आहे. कोणतीही वस्तू सोबत न घेता लोक देश सोडून पळून जात आहेत. काबूल विमानतळावरील व्हायरल व्हिडीओंमध्ये लोकांमधील भीती स्पष्टपणे दिसत आहे. लोकांना कोणत्याही प्रकारे तो देश सोडून जायचे आहे.

देशातून बाहेर पडण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंमध्ये काही लोक धावपट्टीवर धावत्या विमानाच्या बाहेरील बाजूस लटकलेले दिसत आहेत. ही परिस्थिती पाहता भारतातील लोकही यावर प्रतिक्रिया देत आहेत. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बोल्ड स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना राणौतनेहीया प्रकरणावर आपले विचार मांडले आहेत.छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एका क्लायमॅक्स प्रोमोमध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग प्रदर्शित झाला.

यात असे काहीही दाखवले गेले नाही. उलट शेवट दाखवलेल्या कथानकामुळे आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असे म्हटले जात आहे. मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. मालिकेत प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र, या मालिकेचा दुसरा सीझन येणार का? आणि आला तर कधी येणार?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याच दरम्यान या मालिकेची निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.अभिनेत्री मौनी रॉय  तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिची ग्लॅमरस शैली चाहत्यांना खूप आवडते.मौनीचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो. मौनी अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत असते.(Shilpa Shetty News)

अर केलेल्या या फोटोंमध्ये मौनी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.