विरोधकांचे भूलथापा आणि भापकेबाजीला बळी न पडता शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जनतेची कामे करण्यावर भर द्यावा -माजी राज्य मंत्री बदामराव पंडित यांचा शिवसैनिकांना दिला कानमंत्र

गेवराई रोजंदारीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमार्फत, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काही डिजिटल नेते चमकत आहेत. कदाचित त्यामुळे लोक त्यांना ओळखतील, परंतु जे नेते गोरगरिबांच्या अडचणी समजून घेऊन, त्या प्रत्यक्ष सोडविण्यावर भर देतात त्यांच्याच पाठीशी लोक उभा राहून त्यांना साथ देतात.

विरोधकांचे भूलथापा आणि भापकेबाजीला बळी न पडता शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जनतेची कामे करण्यावर भर द्यावा -माजी राज्य मंत्री बदामराव पंडित यांचा शिवसैनिकांना  दिला कानमंत्र
Shiv Sainiks

विरोधकांचे भूलथापा आणि भापकेबाजीला बळी न पडता शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जनतेची कामे करण्यावर भर द्यावा -माजी राज्य मंत्री बदामराव पंडित यांचा शिवसैनिकांना  दिला कानमंत्र

गेवराई  रोजंदारीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमार्फत, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काही डिजिटल नेते चमकत आहेत. कदाचित त्यामुळे लोक त्यांना ओळखतील, परंतु जे नेते गोरगरिबांच्या अडचणी समजून घेऊन, त्या प्रत्यक्ष सोडविण्यावर भर देतात त्यांच्याच पाठीशी लोक उभा राहून त्यांना साथ देतात.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई  रोजंदारीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमार्फत, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काही डिजिटल नेते चमकत आहेत. कदाचित त्यामुळे लोक त्यांना ओळखतील, परंतु जे नेते गोरगरिबांच्या अडचणी समजून घेऊन, त्या प्रत्यक्ष सोडविण्यावर भर देतात त्यांच्याच पाठीशी लोक उभा राहून त्यांना साथ देतात. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापा आणि भपकेबाजीला बळी न पडता, प्रत्येक शिवसैनिकाने गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना अडचणी येणार नाहीत यासाठी काम करावे अशा सूचना शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी उमापुर येथे झालेल्या जनसंवाद बैठकीत कार्यकर्त्यांना दिले आहेत.(Shiv Sainiks)


        जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद गटात जनसंवाद दौरा सुरू केला आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक 22 फेब्रुवारी रोजी उमापूर येथे विराट सभेचे स्वरूप आलेल्या जनसंवाद बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी  माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, माजी सभापती पंढरीनाथ लगड, युवानेते रोहित पंडित, पंचायत समिती गटनेते बापूराव चव्हाण, महादेव औटी, सदाशिवराव आहेर, नंदाकाका जागीरदार, डॉ भैय्यासाहेब पवार, शिवसेना तालुकाप्रमुख कालिदास नवले, तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख शेख सिराज, तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, आपण वर्षभर रात्रंदिवस लोकांची कामे करतो.

त्यांच्या अडचणी सोडतो. त्यामुळे लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. परंतु प्रत्येक गावात मोठ्या संख्येने युवक आहेत. ते नवीन मतदार आहेत. त्यांचे मतदार यादीत नावे लावा. आपल्यासोबत त्यांना घेऊन गावातले कामे करा. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करून, एकाला एक कार्यकर्ता जोडला तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपलाच विजय होईल आणि सामान्य शिवसैनिक लोक प्रतिनिधी म्हणून गावात काम करेल. असे सांगून विरोधकांच्या कोणत्याही भूलथापा आणि फटकेबाजीला शिवसैनिकांनी बळी न पडता जनतेचे प्रत्यक्ष काम करण्यावर भर द्यावा अशा सूचना दिल्या.  युवानेते रोहित पंडित, माजी सभापती पंढरीनाथ लगड म्हणाले की, अमरसिंह पंडित हे वडिलांच्या तर आणि लक्ष्मणराव पवार हे आजोबाच्या वारस हक्काने झालेले आमदार आहेत. या दोन्ही आजी-माजी आमदाराच्या वडिलांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला पिळून काढले होते.

म्हणूनच लोकांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी बदामराव पंडित हा हक्काचा लोकनेता निर्माण केला आहे. बदामराव पंडित यांचे कुटुंब राजकारणात नसेल तर सामान्य माणसाने जायचे कोणाकडे ? हा गंभीर प्रश्न आहे. या लोकनेत्याला राजकीय बळ देण्यासाठी, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे यासाठी आजपासूनच कामाला लागा असे आवाहन केले. बापूराव चव्हाण, महादेव औटी, संभाजी आहेर, कालिदास नवले, बाबुराव कोल्हे, शेख सिराज किरण आहेर यांचीही समयोचित भाषणे झाली.


     विराट सभेचे स्वरूप आलेल्या या बैठकीस आप्पासाहेब दिलवाले, मधुकरराव आहेर, संतोष गिरी, भिवा आप्पा, दिनकर आहेर, कैलास राठोड, पिकाजी राठोड, निवृत्ती गोरडे, आंबादास बोरकर, संदीप जाधव, नवनाथ पारे, शिवाजीराव जाधव, विलास जाधव, अमर बने, भागवत वडघणे, रमेश साळवे, देवा कापसे, अरुण कातखडे, शेख लालमिया, भीमराव गोरडे, ओमकार खरात, रवींद्र वडघणे, महादेव गोरडे, राधाकिसन धोत्रे, महेशराव अरबड, रमेश पवार, संभाजी अरबड, सखाराम चेडे, ईश्वर आहेर, गोकुळ जाधव, दादा बोरकर, श्रीमंतराव खरात, विश्वनाथ सोनवणे, नंदू गोरडे, नंदू खरात, ज्ञानेश्वर जाधव, संग्राम गंगाधर, भैय्या नाईकवाडे, विकास बोरडे, संभाजीराव चव्हाण, जनार्धन कुटे, सुनील वाकडे, पांडुरंग आंधळे, महादेव रोकडे, नामदेव सानप, भाऊसाहेब घाटोळ, भगवानराव पंडित आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.(Shiv Sainiks)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/