उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे चारीत्र्यवान व आदर्श मुख्यमंत्री - जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांचे प्रतिपादन

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला मिळालेले चारित्र्यवान व आदर्श मुख्यमंत्री आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी हिंदुह्रदय बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त आयोजित शिक्षक सेना संपर्क अभियान अंतर्गत शिव सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे चारीत्र्यवान व आदर्श मुख्यमंत्री  - जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांचे प्रतिपादन
Shiv Sanman Award Ceremony

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे चारीत्र्यवान व आदर्श मुख्यमंत्री  - जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांचे प्रतिपादन 

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला मिळालेले चारित्र्यवान व आदर्श मुख्यमंत्री आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी हिंदुह्रदय बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त आयोजित शिक्षक सेना संपर्क अभियान अंतर्गत शिव सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

माधुरी आहेर मोखाडा:

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला मिळालेले चारित्र्यवान व आदर्श मुख्यमंत्री आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी हिंदुह्रदय बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त आयोजित शिक्षक सेना संपर्क अभियान अंतर्गत शिव सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.जिल्हा परिषद केंद्र शाळा खोडाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष असून माझ्या सारख्या अत्यंत साधारण कुटुंबातील मुलाला शिवसेनेने भरपूर काही दिले आहे.माझा मतदारसंघ सोडून मी दुसऱ्या ठिकाणी जाऊन निवडून आलो आहे.हे फक्त शिवसेनेतच घडु शकते असेही यावेळी निकम म्हणाले आहेत. शिवसैनिक हे दुसऱ्याच्या मदतीला धावून येण्यात अग्रेसर असून त्यांची या बाबतीत कोणीही बरोबरी करू शकणार नाही आणि म्हणून उपस्थित शिक्षकांना मी आवाहन करतो कि बिनदिक्कतपणे शिक्षक सेनेत सहभागी व्हा.शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. माझ्या आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे मी सदैव सोबत राहील असेही निकम म्हणाले.(Shiv Sanman Award Ceremony)

पक्षप्रमूख उद्धव ठाकरेंनी शिक्षकांना ज.मो.अभ्यंकर व ज्ञानेश्वर म्हात्रें सारखे शिक्षक हितासाठी अहोरात्र झटणारे दोन खंबीर नेतृत्व दिले असून त्यांच्या नेतृत्वाचा शिक्षकांना नक्कीच फायदा होत आहे असेही यावेळी निकम म्हणाले.मोखाडा शिक्षक सेना पदाधिकाऱ्यांनी शिव सन्मान सोहळ्याचे अतिशय सुंदर नियोजन केले असून या कार्यक्रमात गुणवंत शिक्षकांचा गौरव केल्याने मला मनस्वी आनंद झाला आहे असेही प्रकाश निकम म्हणाले.तर शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष मनीष पाटील म्हणाले की, मोखाडा व प्रकाश निकम या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्या खंबीर नेतृत्वाच्या आधारे शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.ज मो अभ्यंकर यांचे भरारी हे आत्मचरित्र वाचनीय असुन प्रत्येक शिक्षकाने ते खरेदी करा  असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी नितिन आहेर,जगन्नाथ गावीत,बाप्पा साहेब घुले, अमोल घोडके,संतोष चव्हाण,नारायण डावखरे,रामेश्वर जाधव,रोहिदास लिलके,दिनकर फसाळी,अशोक मौळे, निलेश गांगवे,घनश्याम पाटील यांचा गुणवंत शिक्षक म्हणून शिक्षक सेनेच्या वतीने गौरव करण्यात आला.यावेळी सभापती आशा झुगरे, माजी नगरसेवक देविदास काकड, जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना मनीष पाटील,जिल्हा कोषाध्यक्ष आत्माराम हरड,वाडा तालुका अध्यक्ष दिनेश खिल्लारे,वाडा कोषाध्यक्ष भोईर,जिल्हा उपाध्यक्ष भाऊ नावळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव,उपाध्यक्ष सुरेश हमरे,चिटणीस चंद्रकांत नांदे, उपाध्यक्ष सखाराम रेरे,उपाध्यक्ष नितीन आहेर,पतपेढी संचालक संतोष पाटील,मुख्याध्यापक तुकाराम भोये, पदवीधर शिक्षक माधव पाटील,मंगेश मातेरे,सचीन सोनार,संतु बेंडकोळी,भास्कर गारे,ना.गो.ठोंबरे, दिनेश घुले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितिन आहेर यांनी केले.(Shiv Sanman Award Ceremony)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/