गद्दारांच्या नाही तर, विश्वासू मित्रांच्या जीवावर काम केल्याने तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार - बदामरावपंडित रेवकीत शिवसेनेची जनसंवाद बैठक

गेल्या तीस वर्षापासून मी गेवराई तालुक्याच्या सामाजिक चळवळीत काम करत आहे. गट-तट आणि जात-पात याचा कधीच विचार केला नाही. जो येईल त्याचे काम केले. आजही करत आहे.

गद्दारांच्या नाही तर, विश्वासू मित्रांच्या जीवावर काम केल्याने तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार - बदामरावपंडित रेवकीत शिवसेनेची जनसंवाद बैठक
Shiv Sena public meeting

गद्दारांच्या नाही तर, विश्वासू मित्रांच्या जीवावर काम केल्याने तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार - बदामरावपंडित रेवकीत शिवसेनेची जनसंवाद बैठक

गेल्या तीस वर्षापासून मी गेवराई तालुक्याच्या सामाजिक चळवळीत काम करत आहे. गट-तट आणि जात-पात याचा कधीच विचार केला नाही. जो येईल त्याचे काम केले. आजही करत आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

          गेल्या तीस वर्षापासून मी गेवराई तालुक्याच्या सामाजिक चळवळीत काम करत आहे. गट-तट आणि जात-पात याचा कधीच विचार केला नाही. जो येईल त्याचे काम केले. आजही करत आहे. आपण आज पर्यंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले ते, "गद्दारांच्या" जीवावर नाही तर "विश्वासू मित्रांच्या" जिवावर केले.(Shiv Sena public meeting)
       

त्यामुळे कोण कोठे गेला ? याचा मी कधीच विचार करत नाही. पण जो माझ्या सोबत आला त्याला मात्र आयुष्यभर विसरणार नाही. यावेळीही तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.

       शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेवकी या जिल्हा परिषद गटात आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीत ते बोलत होते.
     

 याप्रसंगी जि प माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, युवानेते रोहित पंडित, जय भवानी कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय येवले, शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे, उपजिल्हाप्रमुख शेख सिराज, मधुकर मस्के, कानिफनाथ नागरे, कैलास कोकणे, भास्कर हातागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     प्रास्ताविकपर भाषणात सरपंच तात्याराव सुळ यांनी, आपण बदामराव पंडित यांच्यामुळेच राजकारणात आलो, त्यांच्यासारखा देव माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. 
     

आपण शेवटपर्यंत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे सांगितले. प्रवक्ते दिनकर शिंदे म्हणाले की, बदामराव पंडित यांनी कधीही कोणाचे वाईट केले नाही. म्हणूनच त्यांना विरोधकांच्या कार्यकर्त्यासह वाईट म्हणणारा एकही माणूस मतदारसंघात सापडणार नाही.
     

 म्हणूनच अपक्ष लढूनही त्यांना 52 हजार मते मिळाली आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघात 15 जिल्हा परिषद गट आणि 30 पंचायत समिती गण असल्याने सर्वांचे लक्ष बदामराव पंडित यांच्याकडे लागले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्व सदस्य शिवसेनेचे निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचं रान करावे असे आवाहन केले.

     पुढे बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, आपण विरोधकांप्रमाणे स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा वापर करून त्यांना कधी वाऱ्यावर सोडले नाही. मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली.
     

 या काळात हजारो जिवाभावाचे विश्वासू मित्र मला मिळाले. म्हणूनच मी आजही सक्रियपणे काम करतो. या क्षेत्रात काम करताना गद्दाराच्या जीवावर नाही तर विश्वासू मित्रांच्या जीवावर आपण काम केले आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. 
     

विरोधक भूलथापा आणि भपकेबाजी करून दिखावा करत आहेत, हे आता लोकांनी ओळखले आहे. त्यामुळे येणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीतही विरोधकांना लोक त्यांची जागा दाखवणार हे निश्चित. 
     

असे सांगून, प्रत्येक शिवसैनिकांने आजपासूनच गाव, वाडी, वस्ती, तांड्यावरील घराघरात जाऊन लोकांच्या भेटी घ्याव्यात. त्यांच्या अडचणी समजून घ्या. लोकांचे काही प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत घेऊन या, ते मी प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करील. उसाचे राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. 
     

त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता कोणाच्या धमक्यांना बळी पडू नये. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वासही बदामराव पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.
     
   या विराट बैठकीस आसाराम डिंगरे, शिवाजीराव घाडगे, भाऊसाहेब शिंदे, मुक्ताराम आव्हाड, विशाल उमाप, ऍड रविंद्र डिंगरे, राहुल सौंदलकर, सयाजी जायभाय, दीपक सौंदलकर, सखाराम सौंदलकर, संजय सजगणे, एकनाथ चोरमले, गुजाबा वाघमोडे, लहुराव ढाकणे, साळीकराम कोळेकर, पोपट दाभाडे, अशोकराव शेंडगे, बाबुराव बेदरे, शरद पंडित, अविनाश पंडित, परमेश्वर काळे, सचिन काळे, राजेंद्र येवले, शंकर शिरसाट, रामनाथ माळवदकर, उद्धव भुसे, किरण पराड, संतोष भुसे, कल्याणराव डाके, शहादेव चक्कर, आसाराम पवार, अशोक जावळे, जगन्नाथ चव्हाण, संभाजी उदे, गणेश बोंद्रे, शिवाजीराव टिंगरे, सिताराम जगताप, परमेश्वर पोटे, राजू टकले, सतीश जाधव, अशोक सौंदलकर, राजू दाभाडे, अशोक चोरमले, परमेश्वर चोरमले, राजू बाबरे, रामा चोरमले, बंडू चोरमले, जालिंदर खाडे, बंडू दाभाडे, कैलास भिसे, विकास चोरमले, बालासाहेब कोकणे, युवराज मस्के, भिवाजी येवले, चंद्रसेन जाधव, दिनकर काळे, शेख मुसाभाई, बाळू काळे, जिना काळे, माऊली नलभे, बन्सी पौळ, बंडू मिरपगार, धर्मराज गव्हाणे, सखाराम मुगुटराव, महादेव शिंदे, अविनाश काळे, राजू भावले, बाळू परदेशी, अशोक चिकणे, राजेंद्र डाके, हरिभाऊ गव्हाणे, विठ्ठल डोमाळे, मनोहर मचे, नंदू पारेकर, सचिन काळे, सतीश जाधव, सूर्यकांत टकले, अण्णा खापे,#शिवसेना_सोशल_मीडियाचे शेख नविद, मदन भुसार, सौरभ काळे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनकर शिंदे शिवसेना तालुकाउपप्रमुख गेवराई जिल्हा बीड(Shiv Sena public meeting)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/