श्री सत्यनारायण महापुजेने कार्यक्रमांचा श्रीगणेशा

गेली पावणेदोन वर्षे करोनाच्या महासंकट काळामुळे अनेक सामाजिक संस्थांचे विविध उपक्रमांद्वारे घेण्यात येणारे सेवाभावी काम जवळ जवळ बंदच झाले होते.

श्री सत्यनारायण महापुजेने कार्यक्रमांचा श्रीगणेशा
Shri Satyanarayana Mahapuja

श्री सत्यनारायण महापुजेने कार्यक्रमांचा श्रीगणेशा

गेली पावणेदोन वर्षे करोनाच्या महासंकट काळामुळे अनेक सामाजिक संस्थांचे विविध उपक्रमांद्वारे घेण्यात येणारे सेवाभावी काम जवळ जवळ बंदच झाले होते.

मुंबई गणेश हिरवे:

गेली पावणेदोन वर्षे करोनाच्या महासंकट काळामुळे अनेक सामाजिक संस्थांचे विविध उपक्रमांद्वारे घेण्यात येणारे सेवाभावी काम जवळ जवळ बंदच झाले होते. जेष्ठनागरिक प्रत्यक्षात एकमेकांना भेटूही शकत नव्हते. त्याला नवी मुंबईतील नेरूळ येथील जेष्ठ नागरिक संघही अपवाद नव्हता. पण आता परिस्थीती अंशतः बदलली आहे. कोरोनाचा धोका कमी कमी होत चालला आहे. सरकारनेही वास्तवाचे भान लक्षात घेऊन बऱ्याच गोष्टी शिथील केल्या आहेत. निर्बंधने उठविली आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील नेरूळ येथील जेष्ठ नागरिक संघ पुन्हा उत्साहाने कामाला लागला आहे.(Shri Satyanarayana Mahapuja)

त्यासाठी दिनांक ११.११.२०२१ रोजी संघाच्या नेरूळ येथील श्री गणेश सभागृहात श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करून संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांच्या हस्ते सपत्नीक पुजाविधी संपन्न झाला. कार्यक्रमास  मा. नगरसेवक रविंद्र इथापे, मा. नगरसेविका नेत्रा  शिर्के, डॉ. उपेंद्र किंजवडेकर, डॉ. अनिल देशपांडे, सुभाष, हांडे देशमुख, दिनेश मिसाळसर, मुकुंद कोराणे आदि मान्यवरांच्या व जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडलेल्या या कार्यक्रमात काही सेवाव्रतींचा व जेष्ठ नागरिकांचा तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. गणेश करमरकर यांनी पुजा यथासांग पार पाडली तर नेरूळ गावचे बुवा अमृत पाटील नेरुळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्तीमय भजने गाऊन वातावरणातील पावित्र्य अधिक वृंदीगत केले. संपूर्ण कार्यक्रम नंदलाल बैनर्जी यांच्या सौजन्याने पार पडला. जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारी मंडळातील सर्व सदस्यांनी अपूर्व मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.(Shri Satyanarayana Mahapuja)