सिद्धाराम सालीमठ हे पालघर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी  

पालघर जिल्हा परिषदेचे कार्यरत असलेले मुख्यकार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन याची बदली

सिद्धाराम सालीमठ हे पालघर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी   
Siddaram Salimath is the new Chief Executive Officer of Palghar Zilla Parishad

सिद्धाराम सालीमठ हे पालघर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

 

  पालघर (Palghar) जिल्हा परिषदेचे कार्यरत असलेले मुख्यकार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन याची बदली होऊन त्यांचा पदभार कोकण भवन नवी मुंबई (Konkan Bhavan Navi Mumbai) येथे उपायुक्त पदावर कार्यरत असलेले एस. के. सालीमठ यांनी पालघर (palghar) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी स्वीकारला असून त्यांनी यापूर्वी पालघर (palghar) जिल्ह्यात जव्हार प्रांताधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

कार्यरत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी एस. के. सालीमठ यांचे स्वागत करुन आपला कार्यभार त्यांच्याकडे सुपूर्द करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी सालीमठ यांनी जिल्ह्यातील शेवटच्या घटका पर्यत पोचून काम करण्यासाठी योग्य ते निर्णय घेतले जातील असे मत व्यक्त केले.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

________

Also see : कोरेगाव : 100 खाटांच्या कोविड सेंटरचे लोकार्पण

https://www.theganimikava.com/100-bed-Covid-Center-in-Koregaon-was-inaugurated-by-the-Minister-of-State-for-Home-Affairs