सामाजिक समता अभियान पदाधिकारी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

वासनवाडी,ता, जि, बिड येथे सामाजिक समता अभियान च्या वतीने प्रमुख पदाधिकारी यांचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यशाळा तीन सत्रात संपन्न झाली.

सामाजिक समता अभियान पदाधिकारी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Social Equality Campaign

सामाजिक समता अभियान पदाधिकारी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

वासनवाडी,ता, जि, बिड येथे सामाजिक समता अभियान च्या वतीने प्रमुख पदाधिकारी यांचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यशाळा तीन सत्रात संपन्न झाली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दि 9 वासनवाडी,ता:जि:बिड येथे सामाजिक समता अभियान च्या वतीने प्रमुख पदाधिकारी यांचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळा तीन सत्रात संपन्न झाली.पहिले सत्रात : सामाजिक समता अभियानची भुमीका व उद्देश या विषयावर चर्चा करण्यात आली. सदर कार्यशाळेचे उदघाटन केंद्रीय संघटक प्रा.बाळासाहेब गव्हाणे हस्ते झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चौरंगनाथ ढोकणे होते तर विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शशिकांत जावळे , रवींद्र निकम, प्रा. ईश्वर डोंगरदिवे उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा डॉ विठ्ठल जाधव व स्वागताध्यक्ष प्रा अमोल वाघमारे या सर्व मान्यवरांच्या हास्ते धुप,दिप,पुष्प,आदिंनी सर्व महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.(Social Equality Campaign)


 कवी हेमंत सौंदरमल यांनी सामाजिक समता अभियान गित गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.सामाजिक समता अभियान चे केंद्रीय महासचिव प्रा.शशिकांत जावळे यांनी प्रास्ताविक भाषणात  सामाजिक समता अभियान ची स्थापना कधी व कशी झाली.आज पर्यंत सामाजिक समता अभियान मार्फत सामाजिक, सांसकृतिक, शैक्षणिक, कोणकोणते कार्यक्रम घेतले या विषयीची माहिती फोटो सहित दिली तसेच त्यात सर्व महापुरुषांची जयंती,आँनलाईन व्याख्यानमाला ,गुणवंतांचा सत्कार , अंधश्रद्धा निर्मूलन, युवकांसाठी कार्यकर्ता शिबीर, संविधान गौरव रॅली, इत्यादी वर प्रकाश टाकला


 प्रा.डाॅ.विठ्ठल जाधव सर यांनी सांसकृतिक,शैक्षणिक,राजकिय,सामाजिक कार्यक्रम हाती घेणे.भारतीय समाजात समता,स्वातंञ,बंधुता निर्माण करणे. यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.डाॅ.आत्माराम झुंजुर्डे यांनी सुरेख असे सूत्रसंचालन केले तर आभार उज्वल पनाड यांनी केले. दुसरे सत्रात अध्यक्ष प्रा. नारायण घोलप तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर बावस्कर , प्रा जालींदर वाव्हुळ प्रा. संदिप शेळके उपस्थित होते.या सत्रात प्रमुख वक्ते प्रा.संजय सावते यांनी यथोचित मार्गदर्शन केले.तिसरे समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रविणकुमार डावरे व प्रमुख मार्गदर्शक प्रा.विनोद किर्दक विचार मंचावर उपस्थित होते. 
 प्रा.विनोद किर्दक यांनी मार्गदर्शनात म्हटले.


     रसेल म्हणतो तुम्हाला जर एखाद्या देशाला गुलाम बनवायचे आसेल तर तेथिल शिक्षकांना  गुलाम बनवा म्हणजे ते विद्यार्थी मुला मुलींना गुलाम बनवतील.युनोत  पुढील १५ वर्षात जगात काय करावे यावर उपाय योजना आखली जाते .तसेच नवीन शैक्षणिक धोरण कसे मारक आहे व आजच्या सामाजिक माध्यमांचा वापर कसा करावा यावर सविस्तर असे विश्लेषण केले. 
अध्यक्षीय समारोप करतांना प्रविणकुमार डावरे यांनी आपल्या महापुरुषांच्या संघर्षाचे पहीले लाभार्थी आपण आहोत पण आपल्या समाजाला याचा विसर पडलेला आहे असे दिसते.स्ञि,पुरुष,मुलगा मुलगी समानता आपल्या घरातुन सुरुवात केली पाहीजे.आपल्या बापाने संविधान लिहीले तरी संविधान चालविणारे हात आपले नाहीत.

हे आपण लक्षात घेतले पाहीजे.सामाजिक समता अभियान या पुढे शेतकरी वर्गा साठी लढा देणार आहे.आजचा तरुण हा फास्ट फुड आहे.त्यांला स्वयंपाक करुन खाने आवडत नाही.त्याला रिझल्ट फास्ट पाहीजे.करीता तरुणांची एक फळी आपणास उभी करायची आहे.युवकांचा विकास करावा लागेल.राजकिय जागृती करणे गरजेच आहे.गावागावात सामाजिक समता अभियान ची शाखा उघडून  मुलांना प्रशासकिय सेवेत कसे जाता येईल यावर मार्गदर्शन करावे लागेल.गावागावातुन धम्म शिक्षण देणे गरजेचे आहे.असे सविस्तर विवेचन केले. सूत्रसंचालन लक्ष्मण वाघमारे यांनी व प्रास्ताविक प्रा.डॉ. नवनाथ पवळे यांनी केले तर आभार अरविंद लोंढे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी पंकज साळवे, नितीन बिरारे, सभाष चौतमल, मिलिंद सोनवणे, राजु पगारे, बबन वाघमारे, इत्यादि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.(Social Equality Campaign)