समाजसेवक व पत्रकार डॉ.मुनीर तांबोळी यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी द्या

दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांची राज्यपाल यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी

समाजसेवक व पत्रकार डॉ.मुनीर तांबोळी यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी द्या
Social Worker Muneer Tamboli

समाजसेवक व पत्रकार डॉ.मुनीर तांबोळी यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी द्या; दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांची राज्यपाल यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी

प्रतिनिधी / पनवेल 

दिनांक 16 जून 2020-दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष,हिंदुस्थान २४ तास या न्युज चॅनलचे मुख्य संपादक, केंद्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, पनवेल यांना आपण आता नव्याने होणाऱ्या राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी द्यावी मागणी दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय सचिव श्रेयस ठाकूर यांनी मा.राज्यपाल, महाराष्ट्र  यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.डॉ. मुनीर तांबोळी हे गेली दहा वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या मानवी हक्कासाठी झटत आहेत, आत्ता पर्यंत अनेक  नागरिकांच्या समस्या देखील सोडविण्याचे काम त्यांनी केले. त्याचबरोबर "ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन "च्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट आणि कामगार क्षेत्रातील समस्या शासन दरबारी मांडून सोडविल्या आहेत. गेली अनेक वर्षे, गरीब - गरजू विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च व त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य  ते 'प्रोजेक्ट शिक्षा' या  उपक्रमांतर्गत पुरवित आहेत. ते स्वतः पदवीधर असून, त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन,  'ग्लोबल पिस युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका ' या आंतरराष्टीय युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मानित केले आहे. तसेच आत्ता पर्यंत अनेक राज्य आणि देशांनी त्यांच्या समाजसेवेची दखल घेतली आहे व त्याच्या कामाचे कौतुक देखील केले आहे. अशा उच्चशिक्षित तरुणाला आपण राज्याची सेवा करण्याची संधी दिली तर राज्यातील नागरिकांच्या समस्या ते सोडवू शकतील.
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी   
विधान परिषदेवर डॉ.मुनीर तांबोळी यांना संधी द्यावी असे पत्र ईमेल द्वारे मा.राज्यपाल महोदयांना संस्थेचे राष्ट्रीय सचिव श्रेयस ठाकूर यांच्या स्वाक्षरीने दिले आहे.