सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून कडक निर्बंध

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून कडक निर्बंध
Solapur Corona Update

सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून कडक निर्बंध

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत.(Solapur Corona Update)

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे कोरोना निर्बंधांबाबतच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीही या तालुक्यांचा उल्लेख करत कोरोना वाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं रात्री हा आदेश काढला आहे.

-सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कडक निर्बंध.
-13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरु राहणार आहेत.
-अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकानं पूर्णपणे बंद असतील.
-मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असेल.
-विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी असेल.
-अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी लागू.
-खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार.पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असल्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी करण्यात येत होती. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत होतं. आज अखेर राज्य सरकारकडून पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. 

-सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
-हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
-शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
-मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश


पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. पुण्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तर शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास सर्व शिथिलता मागे घेतली जाणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला. तसंच सरकारनं घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.(Solapur Corona Update)

दुकानदार, त्यांचे कर्मचारी त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.