प्रयोगशाळा, हॅट्स ऑफ सोनम वांगचूक
अमीर खान यांच्या "थ्री इडियट" या हिंदी चित्रपटातील "फूलसुख वांगडू" ही भूमिका ज्यांच्या जीवनचरीत्रावर आधारित आहे,या व्यक्तीवर मी मनातून प्रेम करतो,त्यांना सतत विविध समाजमाध्यमांमधून फॉलो करतो.

प्रयोगशाळा, हॅट्स ऑफ सोनम वांगचूक
अमीर खान यांच्या "थ्री इडियट" या हिंदी चित्रपटातील "फूलसुख वांगडू" ही भूमिका ज्यांच्या जीवनचरीत्रावर आधारित आहे,या व्यक्तीवर मी मनातून प्रेम करतो,त्यांना सतत विविध समाजमाध्यमांमधून फॉलो करतो.
बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
अमीर खान यांच्या "थ्री इडियट" या हिंदी चित्रपटातील "फूलसुख वांगडू" ही भूमिका ज्यांच्या जीवनचरीत्रावर आधारित आहे,या व्यक्तीवर मी मनातून प्रेम करतो,त्यांना सतत विविध समाजमाध्यमांमधून फॉलो करतो,ती महनीय व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध संशोधक अभियंते,जागतिक स्तरावरील नामांकित रोलॅक्स व मॅगसेसे पुरस्कार प्राप्त शिक्षण सुधारक,ज्यांच्या नावावर 400 पेक्षा अधिक संशोधनाचे "पेटंट" आहेत असे हिमालयपुत्र "सोनम वांगचूक".(Sonam Wangchuk biography)
तमाम भारतीयांना अभिमान वाटावा असे सत्कार्य सोनमजींनी नुकतेच केले आहे,अंतःकरणातून सॅल्यूट करावा असा शोध आणि कामगिरी त्यांनी केली आहे.भारतातील विविध दुर्गम भागात तसेच -30 डिग्री पेक्षाही कमी तापमान असणाऱ्या लेह-लद्दाख,कारगील सारख्या हिमालयाच्या कुशीत लष्करी सेवा देणाऱ्या,देशासाठी लढणाऱ्या भारतीय जवानांकरीता त्यांनी सौर ऊर्जेवरील हिटर निर्माण केले असून या हिटरद्वारा अद्ययावत गेस्ट हाऊस व कॅम्पस निर्माण केले आहेत.बाहेर -30 डिग्री तापमान असताना या कॉटेज मध्ये +20 डिग्री सेल्सिअस तापमान असते.आपल्या देशाकरीता,आपल्या भारतीय सैन्याकरीता ही खूप मोठी उपलब्धी आहे.नुकतेच असे अनेक गेस्ट हाऊस त्यांनी देशाला समर्पित केले आहेत.
लद्दाकच्या शैक्षणिक सांस्कृतिक,पर्यावरण क्षेत्रात सोनमजी सातत्याने महान कार्य करीत आहेत.शाळेतून काढलेले व शाळा सोडलेल्या 1000 विध्यार्थ्यांना सोबत घेवून त्यांनी लद्दाकमध्ये एका अभिनव शाळेची उभारणी केली असून या शाळेत अभ्यासक्रमापेक्षाही प्रात्यक्षिके शिकविली जातात व नवनिवन शोध लावले जातात.खऱ्या अर्थाने जीवनाचा अभ्यासक्रम शिकविणारी शाळा त्यांनी उभारली आहे.
सोनमजींकडे 400 हून अधिक शोधबाबत पेटंट आहेत.लद्दाकमध्ये नंदनवन फुलविणारा सोनमजींचा एक महत्वपूर्ण शोध म्हणजे "हिमस्तूप".हिवाळ्यात कृत्रिम हिमनदी तयार करुन कृत्रिम "ग्लेशियर" निर्माण केले जाते,मोठ्या आकाराचे "हिमस्तूप" निर्माण केले जाते.या एका हिमस्तूप मध्ये किमान 20 लक्ष लिटर पाणी साठविले जाते,उन्हाळ्यात याचा वापर पाईपलाईन द्वारे शेतीसाठी केला जातो.या शोधामूळे लेह लद्दाक सारख्या दुर्गम भागात नंदनवण फुलत आहे.
सोनमजींनी पुढील काळात असेच यशस्वी संशोधन करावी अधिकाधिक शोध लावावीत ही एक भारतीय म्हणून अपेक्षा आहे.जीवनात एकदा तरी त्यांना लद्दाक मध्ये जावून भेटण्याची व त्यांनी निर्माण केलेली "प्रयोगशाळा" व त्यांचे विविध संशोधनकार्य बघण्याची ईच्छा आहे!बाजीराव धर्माधीकारी, परळी,वै.(Sonam Wangchuk biography)