वंचित उपेक्षित बहुजनांनो सोयगाव नगरपंचायतची सत्ता आपल्या ताब्यात घ्यावी . . . ज्ञानेश्वर कवठेकर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा पक्ष प्रतिनिधी / बीड राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महानगरपालिका,नगरपालिका तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

वंचित उपेक्षित बहुजनांनो सोयगाव नगरपंचायतची सत्ता आपल्या ताब्यात घ्यावी . . .   ज्ञानेश्वर कवठेकर
Soygaon Nagar Panchayat

वंचित उपेक्षित बहुजनांनो सोयगाव नगरपंचायतची सत्ता आपल्या ताब्यात घ्यावी:ज्ञानेश्वर कवठेकर

 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा पक्ष प्रतिनिधी / बीड  राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महानगरपालिका,नगरपालिका तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा पक्ष प्रतिनिधी / बीड  राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महानगरपालिका,नगरपालिका तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.वंचित बहुजन आघाडी देखील महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका,नगरपालिका व नगरपंचायत च्या निवडणूका पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहे वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी लोकसभा विधानसभा ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना टक्कर दिली आहे आत्तापर्यंत हे सर्व प्रस्थापित पक्ष वंचित उपेक्षितांनवर सत्ता गाजवत आले आहेत.(Soygaon Nagar Panchayat)


पण यापुढे वंचित उपेक्षित बहुजनांना प्रस्थापितांची गुलामी न करता आपण आता सत्ताधारी होऊ शकतो वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश कथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी ची निर्मिती सर्व वंचित उपेक्षित बहुजनांना सत्तेत घेऊन जाण्यासाठी काढली आहे आज महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज आदरणीय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक होत आहे ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांची ही भूमिका आहे.

की या महाराष्ट्रातील तळागाळातील वंचित उपेक्षित बहुजन समाज हा सत्तेत गेला पाहिजे सत्तेत जाण्याचा त्यांनाही अधिकार आहे गेली 70 वर्ष या गोरगरीब जनतेवर प्रस्थापित सत्ता गाजवतात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे धोरण हे प्रस्थापित राबवित आहे पण ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सर्व वंचित उपेक्षितांना असे दाखवून दिले आहे की आपण सर्व जर एकत्र आलो तर आपणही या सत्तेत जाऊ शकतोत तसेच या प्रस्थापितांची घराणेशाही संपवायची असेल तर तुम्हाला आम्हाला सर्व बहुजनांना एकत्र येऊन या प्रस्थापितांच्या विरोधात लढावे लागेल ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका आहे की तळागाळातील वंचित उपेक्षितांच्या हातामध्ये या देशाची राज्याची सत्ता गेली पाहिजे.सोयगाव शहरातील गरीब मराठा,कुंभार,लोहार,माळी,नाव्ही, मुस्लिम,कैकाडी,भटके-विमुक्त लिंगायत यांनी एकत्र येऊन सोयगाव नगरपंचायत ची सत्ता वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून आपल्या ताब्यात घ्यावी व सोयगाव नगरपंचायती वर वंचित बहुजन आघाडीच्या झेंडा फडकावा.(Soygaon Nagar Panchayat)

असे आवाहन सोयगाव नगरपंचायत निवडणुकीचे निरीक्षक ज्ञानेश्वर कवठेकर यांनी सोयगाव शहरातील जनतेला केले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत