दरमहा 40000 पेक्षा जास्त फायदा, 80% सरकारची मदत

लॉकडाऊनदरम्यान जेव्हा सर्व उद्योग प्रभावित झाले होते, तेव्हाही पार्ले जी बिस्किटे इतकी विकली गेली आहेत की, गेल्या 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला.

दरमहा 40000 पेक्षा जास्त फायदा, 80% सरकारची मदत
Start Business At Rs 1 Lakh

दरमहा 40000 पेक्षा जास्त फायदा, 80% सरकारची मदत

लॉकडाऊनदरम्यान जेव्हा सर्व उद्योग प्रभावित झाले होते, तेव्हाही पार्ले जी बिस्किटे इतकी विकली गेली आहेत की, गेल्या 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला. 

आम्ही तुम्हाला एका खास व्यवसायाबद्दल सांगत आहोत, ज्याची सुरुवात तुम्ही कमी पैशाने करू शकता आणि जास्त नफा कमवू शकता. आम्ही बिस्किटांबद्दल बोलत आहोत, होय बिस्किटे ही एक अशी  गोष्ट आहे, ज्याची नेहमी मागणी असते. बिस्किटांची मागणी कधीही कमी होत नाही. लॉकडाऊनदरम्यान जेव्हा सर्व उद्योग प्रभावित झाले होते, तेव्हाही पार्ले जी बिस्किटे इतकी विकली गेली आहेत की, गेल्या 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला. अशा परिस्थितीत बेकरी उत्पादन बनवण्याचे युनिट उभारणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.(Start Business At Rs 1 Lakh)

जर तुम्हाला बेकरी उघडायची असेल तर खुद्द मोदी सरकार यासाठी मदत करत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. एकूण खर्चाच्या 80 टक्क्यांपर्यंत सरकारकडून निधीची मदत मिळेल. यासाठी सरकारने स्वतः प्रकल्प अहवाल तयार केलाय. सरकारच्या व्यवसायाच्या संरचनेनुसार, सर्व खर्च वजा केल्यानंतर तुम्हाला दरमहा 40 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.प्रकल्पाच्या उभारणीसाठी एकूण खर्च: 5.36 लाख रुपये, यामध्ये तुम्हाला तुमच्याकडून फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील.


 जर तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत निवडले तर तुम्हाला बँकेकडून 2.87 लाख रुपयांचे मुदत कर्ज आणि 1.49 लाख रुपयांचे कार्यशील भांडवल कर्ज मिळेल. प्रकल्पाअंतर्गत आपल्याकडे 500 चौरसपर्यंत आपली स्वतःची जागा असावी. नसल्यास ती भाड्याने घ्यावी लागेल आणि प्रकल्पाच्या फाईलसह दाखवावी लागेल.तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यात हे तपशील द्यावे लागतील. नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, चालू उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे.(Start Business At Rs 1 Lakh)

यामध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क किंवा हमी शुल्क भरावे लागणार नाही. कर्जाची रक्कम 5 वर्षांत परत केली जाऊ शकते.