पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भारतीय स्टेट बँकेच्या रझाकारी कारभारा विरोधात दिव्यांगाचा प्राणांती सत्यागृह

२६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे या अन्याया विरोधात दाद मागून बँक प्रशासनाच्या रझाकारी कारभारा विरोधात प्राणांतीक अन्नत्यागास सुरुवात केली आहे या प्राणांतीक अन्नत्यागा आंदोलना संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी परभणी, जिल्हा निबंधक परभणी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भारतीय स्टेट बँकेच्या रझाकारी कारभारा विरोधात दिव्यांगाचा प्राणांती सत्यागृह
State Bank of India

पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भारतीय स्टेट बँकेच्या रझाकारी कारभारा विरोधात दिव्यांगाचा प्राणांती सत्यागृह

२६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे या अन्याया विरोधात दाद मागून बँक प्रशासनाच्या रझाकारी कारभारा विरोधात प्राणांतीक अन्नत्यागास सुरुवात केली आहे या प्राणांतीक अन्नत्यागा आंदोलना संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी परभणी, जिल्हा निबंधक परभणी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भारतीय स्टेस्ट बँकेकडे समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून अपंगासाठीची बीज भांडवल कर्ज योजनेची किराणा दुकानासाठीची कर्ज फाईल मागील दोन वर्षापासून बँक दत्तक नसल्याचे कारण दाखवून भारतीय स्टेट बँक शाखा ताडकळस प्रशासनाने नाकारून संबंधित दिव्यांग लाभधारकाचा सातत्याने मानसिक छळ चालवल्याचे निदर्शनास येत असून संबंधित बँकेतील बेलगाम अधिकारी जाणीवपूर्वक दिव्यांग कर्ज लाभार्थी युवकाचा छळ करीत असल्यामुळे दिव्यांग अपंग सचिन ज्ञानेश्वर सोनकांबळे यांनी शेवटचा पर्याय म्हणून आज प्रजासत्ताक दिनी बुधवार दि.२६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे या अन्याया विरोधात दाद मागून बँक प्रशासनाच्या रझाकारी कारभारा विरोधात प्राणांतीक अन्नत्यागास सुरुवात केली आहे या प्राणांतीक अन्नत्यागा आंदोलना संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी परभणी, जिल्हा निबंधक परभणी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.(State Bank of India)

या कर्ज प्रकरणा संदर्भात दिव्यांग सचिन सोनकांबळे यांनी वेळोवेळी भारतीय स्टेट बँक प्रशासनातील गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना  निवेदन सादर केली परंतु या दिव्यांग युवकाच्या परिस्थितीवर संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे दिव्यांग सचिन सोनकांबळे यांच्याकडून यापुर्वी सुद्धा दि.२६ ऑगष्ट २०२१ रोजी आमरण उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दि.०२ सप्टेंबर २०२१ रोजी बँकेस या कर्ज प्रकरणा संदर्भात पत्र परंतु जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याही पत्राला बँकेच्या मुजोर अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.


भारतीय स्टेट बँक प्रशासनासह जिल्हा प्रशासन समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद आदींना मागील दोन वर्षापासून पुर्णा तालुक्यातील महातपुरी येथील दिव्यांग अर्जदार सचिन ज्ञानेश्वर सोनकांबळे यांनी सातत्याने दिलेल्या अर्जात असे नमुद केले आहे की मी पायाने ५०% अपंग असून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या अपंगाच्या कोट्यातून समाजकल्याण विभागा मार्फत बीज भांडवल योजने अंतर्गत १,५०,०००/- रुपयें (अक्षरी एक लाख पन्नास हजाराची रुपये) कर्ज प्रकरणाची फाईल भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा समाज कल्याण कार्यालय DISTRICE ताडकळस या बँकेत सादर केली. तो प्रस्ताव दोन वर्षापासून बँकेने स्वत:कडे ठेवून ऐन वेळेस गाव दत्तक तसल्याचे कारण सांगून माझ्या कर्ज प्रकरणाची फाईल बँकेने नाकारली आहे. त्यामुळे माझ्यावर व माझ्या संबंध कुटुंबावर उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ बँकने आणली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ताडकळस जबाबदार आहे.

परंतु मला परत बँकेत आलात तर गुन्हा दाखल करण्याची धमकी बँक प्रशासनाने अनेक वेळा दिली आहे. शासनाचे अपंगासाठी पुनर्वसन व मदतीची घोषणा संपूर्ण राज्यात चालू आहे.अपंगाच्या हाताला कामे देऊन त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्याचे काम शासन करीत आहे. परंतु ताडकळस बँक प्रशासनाने उलट माझ्यावरच गुन्हा करण्याची धमकी देऊन शासनाच्या पवित्र योजनेला हाडताळ फासली आहे.


भारतीय स्टेट बँक ताडकळस शाखेतील अधिकाऱ्यांच्या रझाकारी प्रवृत्तीमुळे एका दिव्यांग युवकावर भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अक्षरशः प्राणांतीक अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ यावी यापेक्षा मोठी शरमेची बाब कोणती असेल ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित दिव्याग युवकाच्या जिविताचे काही बरे वाईट झाल्यास यास सर्वस्वी भारतीय स्टेट बँक ताडकळस शाखेतील मुजोर अधिकारी जवाबदार राहतील.(State Bank of India)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/