राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धत जिल्हा परिषद शाळा सफाळे नंबर १ च्या इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे माझा आवडता खेळ किंवा माझा आवडता खेळाडू या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होते.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धत जिल्हा परिषद शाळा सफाळे नंबर १ च्या इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश
State Level Eloquence Competition

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धत जिल्हा परिषद शाळा सफाळे नंबर १ च्या इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे माझा आवडता खेळ किंवा माझा आवडता खेळाडू या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होते.

रविंद्र घरत पालघर प्रतिनिधी:

 ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे माझा आवडता खेळ किंवा माझा आवडता खेळाडू या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद शाळा सफाळे नं१ येथील २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भावार्थ बोंबडी यांनी राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला असून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.(State Level Eloquence Competition)

पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सफाळे नंबर १ येथे (दि १५ रोजी)  ट्रॉफी व प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य  हर्षा उराडे,  शाळेचे  मुख्याध्यापक निलेश वैती   यांच्या हस्ते संपन्न झाला.या स्पर्धेत भावार्थ बोंबाडी या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला असून वेद पाटील, गार्गी गावडे, प्रचेता पाठक, गौरांग पाटील या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे .तसेच रुद्र डामसे, आद्य चूरी, मित उराडे, प्रथी पाठक, श्रीयान भोईर, जनस्वी केळवेकर , क्रिशा वैद्य ,रुद्र वरठा, प्रतिक भोइर ,अक्षरा इंदुलकर, आयत शेख ,राहुल परब ,कल्याणी भटकर ,मुद्रा भोईर, वैष्णवी खर्चे, रुद्र म्हात्रे ,चित्राक्ष परमार,अवनी पाटील या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सहभाग प्रमाणपत्र मिळाले.या निवडीबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जिल्हा परिषद शाळा सफाळे नंबर १ येथील इयत्ता पहिलीच्या शिक्षिका प्रगती प्रशांत पाटील यांना सावित्रीच्या लेकी विचार मंच महाराष्ट्र राज्य उपक्रमशील शिक्षिका प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य  हर्षा उराडे व मुख्याध्यापक  निलेश वैती  यांच्या हस्ते प्रगती  पाटील यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.(State Level Eloquence Competition)