मराठी पत्रकार संघाकडून कोरोना संसर्गामुळे दगावल्यास त्यांच्या कुटूंबियांना तातडीने विमा सरक्षण मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर कडून कोरोना संसर्गामुळे दगावल्यास त्यांच्या कुटूंबियांना ५० लाखांचा तातडीने विमा सरक्षण मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर कडून कोरोना संसर्गामुळे दगावल्यास त्यांच्या कुटूंबियांना ५० लाखांचा तातडीने विमा सरक्षण मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
ठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर (जिल्हा) च्या सर्व सभासदांनी आज मंगळवार दि.29 सप्टेंबर 2020 रोजी मा. श्री राजेश नार्वेकर ठाणे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी निवेदन देण्यात आले .गेले अनेक महिने कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे ठाण्यातील पत्रकारही आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे अशा परिस्थितीत एखाद्या पत्रकार बांधवांना कोरोना संसर्ग झाला तर ते परवडणारे नाही.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्रकार बांधवांसाठी कोविड सेंटरमध्ये विशेष राखीव अलगीकरण आणि मोफत उपचार,तसेच संसर्गामुळे दगावल्यास त्यांच्या कुटूंबियांना ५० लाखांचा तातडीने विमा सरक्षण मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहरचे पदाधिकारी श्री नितीन शिंदे, प्रकाश दळवी, सतीशकुमार भावे, संजय दळवी, ज्योती चिंदरकर, प्रमोद घोलप, संतोष पडवळ, सचिन ठीक, शिवाजी कोळीसह इतर मान्यवर पत्रकार हजर होते.
ठाणे
प्रतिनिधी - सत्यवान तरे
________
Also see : लोक हिंद गौरव २०२० पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन: महेश धानके
https://www.theganimikava.com/Appeal-to-send-proposal-for-Lok-Hind-Gaurav-2020-award-Mahesh-Dhanke